सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना अटक

पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास को ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना बँकेतील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आज अटक केली.
सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना अटक
Bank.jpg

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास को ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना बँकेतील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आज अटक केली. मात्र, अटकेनंतर रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांचा रिमांड घेता आला नाही. परिणामी पोलिस चौकशीस तूर्तास ब्रेक लागला आहे. 

पिंपरी कँपातील सिंधी व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा विकास बँक ओळखली जाते. तिच्या शहराबाहेरही शाखा आहेत. तिचे मूलचंदानी हे गेली दहा वर्षे अध्यक्ष होते. जानेवारी महिन्यात त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचे स्थानिक भाजप नेत्यांशी सबंध आहेत. याच पक्षाच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते तसेच बडे फिल्मस्टार यांच्याबरोबरही त्यांचे फोटो आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काल रात्री मुंबईत त्यांना २०१९ च्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यात या बँकेचे दुसरे माजी अध्यक्ष फिर्यादी आहेत. रिझर्व बँकेचे नियम झुगारून कर्ज वाटप करणे, चुकीच्या पद्धतीने ते दिल्याने त्याची वसूली न झाल्याबद्दल मुलचंदानींसह बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध हा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर यावर्षी जानेवारीत त्यांनी अध्यक्ष आणि संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात चोरीचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झाला होता.

दरम्यान, अटक केलेल्या गुन्ह्यातील मुलचंदानींचा रिमांड राखून ठेवून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त क्रुष्णप्रकाश यांनी सांगितले. तसेच ते आणखी एका आणखी गुन्ह्यात वांटेड असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in