कृष्णा कारखान्यात प्राथमिक कल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने.... - The primary trend in the Krishna factory is on the side of the authorities .... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

कृष्णा कारखान्यात प्राथमिक कल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जुलै 2021

74 टेबलवर मतमोजणी सुरू असून दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होईल. पहिली फेरी साधारण एक वाजेपर्यंत पूर्ण होणार असून दुसऱ्या फेरीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी आज कराडात मतमोजणी सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी सहकार पॅनलकडे निकालाचा प्राथमिक कल असल्याचे चित्र आहे. पुढील अर्ध्या तासात पहिल्या फेरीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील मते हाती येतील, असा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. The primary trend in the Krishna factory is on the side of the authorities ....

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रत्यक्ष मतमोजणी दहा वाजता सुरू झाली. मतदान केंद्रनिहाय मोजणी सुरू आहे. प्रथम कऱ्हाड तालुक्यातील मोजणी सुरू असून 11 पर्यंतच्या आकडेवारीनुसार प्राथमिक कल सत्ताधारी सहकार पॅनेलकडे आहे. संस्थापक व रयत पॅनेलची आकडेवारी कमी जास्त होत आहे.

हेही वाचा : सहा महिन्यांत एलपीजी सिलिंडर 140 रुपयांनी महागला..स्मृती इराणी पुन्हा चर्चेत

पुढील अर्ध्या तासात पहिल्या फेरीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, महिला प्रवर्गातील उमेदवारांची मते जाहीर होण्याची शक्यता आहे. 74 टेबलवर मतमोजणी सुरू असून दोन फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होईल. पहिली फेरी साधारण एक वाजेपर्यंत पूर्ण होणार असून दुसऱ्या फेरीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत सत्ताधारी सहकार पॅनच्या बाजूने कल दिसून येThe primary trend in the Krishna factory is on the side of the authorities ....त आहे.

आवश्य वाचा : एका फोटोमुळे आयुष्य बदललं ; IAS चांदणी चंद्रन यांनी सांगितली एका लग्नाची गोष्ट

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख