एका फोटोमुळे आयुष्य बदललं ; IAS चांदणी चंद्रन यांनी सांगितली "एका लग्नाची गोष्ट"  - ias officer chandni chandran shared pic with husband arun sudarsan | Politics Marathi News - Sarkarnama

एका फोटोमुळे आयुष्य बदललं ; IAS चांदणी चंद्रन यांनी सांगितली "एका लग्नाची गोष्ट" 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

एका फोटोमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलले यांची रंजक माहिती त्यांनी शेअर केली आहे. 

नवी दिल्ली  : आयएएस IAS अधिकारी चांदणी चंद्रन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतानाचा एक फोटो टि्वटर शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. चांदणी या २०१७च्या बॅचच्या आयएएस IAS अधिकारी आहेत. सध्या त्या त्रिपुरा येथील कंचनपूर येथे उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. हा फोटो शेअर करीत असताना त्यांनी  IAS बनण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली आहे. या एका फोटोमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलले यांची रंजक माहिती त्यांनी शेअर केली आहे. ias officer chandni chandran shared pic with husband arun sudarsan 

चांदणी चंद्रन यांनी आपल्या टि्वटवरुन २०१६ चा एक फोटो शेअर केला आहे. जो टाइम्स आँफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाला होता. आपला बॉयफ्रेंड (आता पती असलेले) अरुण सुदर्शन यांच्यासोबत त्या फोटोमध्ये आहेत. त्या आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, १० मे २०१६ रोजी स्पर्धा परीक्षा २०१५ चा निकाल होता. त्यामुळे खूप ताण होता. मी आणि अरुण ताण दूर करण्यासाठी फिरायला बाहेर पडलो होतो. परीक्षेचा निकाल लागला पण मी पात्र ठरली नाही. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सर्व यशश्वी विद्यार्थ्यांचे फोटो छापले होते. आमचा हा फोटो टाइम्स आँफ इंडियाने छापला होता. अरूणने टाइम्स आँफ इंडियामध्ये हा फोटो छापल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

''तेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं. मी या फोटोचा प्रतिकात्मक पद्धतीने स्वीकार केला. माझा फोटो युपीएससीच्या टाँपरमध्ये प्रसिद्ध व्हायला हवा होता. आणि मी आनंदाने पुढचं पाऊल टाकत असताना कुणीतरी माझ्यावर छत्री धरुन प्रेमाने पाहत आहे. पण हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर मी युपीएससी परीक्षा चॅलेज म्हणून स्वीकारली. अन् पुढच्या वर्षी २०१७ मध्ये मला युपीएससीत यश मिळाले. यानंतर आम्ही विवाह केला. काही दिवसापूर्वी मी या फोटो बाबत विचार करीत होती. अरुणने फोटोग्राफर राकेश नायर यांच्याशी संपर्क साधून तो फोटो मिळविला. नायर यांचे आभार'' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

हजारोंचे दृष्टीदाते डाँ. लहानेंची 'मोठी गोष्ट'
बारामती : ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना नेत्रदान करणारे प्रसिध्द नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल (ता. 30) सेवानिवृत्त झाले. बिनटाक्याच्या मोतीबिंदूच्या लाखाहून अधिक शस्त्रक्रिया करुन समाजातील कष्टकरी, शेतकरी व अगदी उच्चभ्रू लोकांनाही नवदृष्टी देण्याचे काम डॉ. लहाने यांनी केले. 
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख