सहा महिन्यांत एलपीजी सिलिंडर 140 रुपयांनी महागला..स्मृती इराणी पुन्हा चर्चेत

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली असून, मागील सहा महिन्यांत 140 रुपयांची दरवाढ झाली आहे.
congress targets smriti irani over lpg cylinder rates hike
congress targets smriti irani over lpg cylinder rates hike

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. यावरुन विरोधी पक्षांनी आता केंद्री य मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी लक्ष्य करण्या सुरवात केली आहे. 

गॅसची दरवाढ होताच सोशल मीडियावर स्मृती इराणी यांना लक्ष्य केले जाऊ लागले आहे. भाजप विरोधी पक्षात असताना इराणी या सातत्याने गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करीत असत. आता सोशल मीडियावर इराणी यांना पुन्हा आंदोलन करण्याचे आव्हान दिले जात आहे. नेटिझन्स इराणी यांच्या गॅस दरवाढीविरोधातील जुन्या आंदोलनांचे फोटोही शेअर करीत आहेत. 

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांनी इंधन दरवाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह स्मृती इराणी यांना लक्ष्य केले. त्यांनी इराणी या गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा फोटो त्यांनी ट्विट केला असून, त्यांनी म्हटले आहे की, एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपये वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत सिलिंडर 140 रुपयांनी महागला आहे. थँक यू मोदीजी. विशेष आभार स्मृती इराणी.
  
हेही वाचा : एलपीजी सिलिंडरची पुन्हा दरवाढ...जाणून घ्या दर 

देशात पेट्रोलआणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 

जनतेच्या खिशाला कात्री 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून आधी वर्षाला 72 हजार 160 कोटी रुपये मिळत होते. ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या दहा महिन्यांतच सरकारने यातून 2.94 लाख कोटी रुपयांची कमाई केली. याचवेळी सर्वसामान्यांचा विचार करता 2014 पासून त्यांच्या उत्पन्नात केवळ 36 टक्के वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com