निवडणुकीसाठी मते मागायला नव्हे, तर काळजातल्या वेदना हटवण्यासा आलोय...

दरडीग्रस्तांबरोबरच मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनप्रश्नी लवकरच मंत्रालयाचा दरवाजा ठोठावण्याचे नियोजन संभाजी ब्रिगेडने केल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीसाठी मते मागायला नव्हे, तर काळजातल्या वेदना हटवण्यासा आलोय...
Not to ask for votes for the election, but to alleviate your grief says Sambhaji Brigades Abhimanyu Pawar

ढेबेवाडी : ''आम्हाला इथं येऊन कोणतीही निवडणूक लढवायची नाही आणि मतेही मागायची नाहीत. तुमच्याशी जोडल्या गेलेल्या माणुसकीच्या नात्याची ओढच पुन्हा इथे घेऊन आली आहे. आम्हाला तुमच्या काळजातल्या वेदना हटवायच्या आहेत. जोपर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत संभाजी ब्रिगेड लढत राहणार,'' असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला. Not to ask for votes for the election, but to alleviate your grief says Sambhaji Brigades Abhimanyu Pawar
 
जिंती (ता. पाटण) विभागातील वाड्यावस्त्यांत डोंगर व जमीन खचून दरडी कोसळल्याने निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांचे विविध प्रश्न समजून घेतले. तसेच येथील दरडीग्रस्तांबरोबरच मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनप्रश्नी लवकरच मंत्रालयाचा दरवाजा ठोठावण्याचे नियोजन संभाजी ब्रिगेडने केल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे, संघटक श्रीकांत गिरी, दत्ता कोळेकर आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, ''हा जगण्या- मरण्याचा विषय आहे. उद्‌ध्वस्त आणि धोकादायक स्थितीतील संसार आपणास पुन्हा उभे करायचे आहेत. त्यासाठी संघर्ष करावाच लागेल. या लढ्यात संभाजी ब्रिगेड तुमच्याही चार पावले पुढेच असेल.'' 

सुहास राणे म्हणाले, ''काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज वाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत घेऊन येथे आलो होतो. लवकरच मंत्रालयाचे दरवाजे ठोठावून न्याय मिळेपर्यंत लढत राहू.'' जिंतीतील नागरिकांनी विविध प्रश्न व समस्या मांडून सुरक्षित ठिकाणी तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in