पाटणींना तो राग आमच्यावर काढायचा आहे : भावना गवळी 

सर्व गैरव्यवहारा संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाटणी यांची सिबीआय व ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.
  Bhavana Gawli criticizes Kirit Somaiya . jpg
Bhavana Gawli criticizes Kirit Somaiya . jpg

वाशिम : बालाजी पार्टीकल बोर्डाचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) वाशिम जिल्ह्यात येऊन माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. सोमय्या हे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी जमीनीची फेरफार करून केलेल्या 500 कोटीच्या घोटाळ्यावर गप्प का असा प्रश्न शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांनी उपस्थित करत भाजपवर टीका केली. (Bhavana Gawli criticizes Kirit Somaiya)   

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे बालाजी पार्टीकल बोर्डाची पाहणी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात देगाव येथे आले होते. त्यामुळे खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कागदपत्रांची चुकीच्या पद्धतीने फेरफार व नोंदी करून नियमबाह्य पध्दतीने उभारलेल्या पाटणी व्यापारी संकुलामध्ये आमदार  पाटणी व त्यांच्या कुटूंबीयांनी पाचशे कोटी रुपयाचा गैरव्यवहार केला आहे, असा आरोप गवळी यांनी केला. या सर्व गैरव्यवहारा संदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाटणी यांची सिबीआय व ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे गवळी यांनी सांगितले. 

त्यावेळी आम्हीच टोकाचा विरोध करुन ही जागा पाटणीकडून परत मिळवली होती. विरोधक व भुमाफीयांना हा सर्व राग काढायचा असल्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर खोटे नाटे आरोप सुरु आहेत. तेंव्हा पाटणी व्यापारी संकुलामध्ये झालेल्या पाचशे कोटीच्या घोटाळ्याची चौकशी सोमय्या करतील का, असा सवाल गवळी यांनी केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, नगरसेवक ऍड. विनोद खंडेलवाल, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, रवि पवार, रवि भांदुर्गे उपस्थीत होते.  
Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com