यासाठी जयंत पाटलांनी डॉ. अमोल कोल्हेंना बोलवून घेतले.... - Development of Bhuikot fort in Shirala; Shiv Sanskar will be a creation memorial | Politics Marathi News - Sarkarnama

यासाठी जयंत पाटलांनी डॉ. अमोल कोल्हेंना बोलवून घेतले....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 जून 2021

जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती देणारे, शिवसंस्कार सृष्टी स्मारक बनवण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची संकल्पना आहे. याबाबतीतही यावेळी चर्चा करण्यात आली.

सांगली : स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या विकासाबाबत आज बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अतुल बेनके आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर, महाराजांची सुटका करण्यासाठी याच किल्ल्यावर प्रयत्न झाला होता. हे या किल्ल्याचे महत्त्व आहे. शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी व्हावी हा किल्ल्याचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही यात काही सुचना केल्या.

हेही वाचा : भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या; दहशतवाद्यांनी घरात घुसून केला गोळीबार

जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती देणारे, शिवसंस्कार सृष्टी स्मारक बनवण्याची खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची संकल्पना आहे. याबाबतीतही यावेळी चर्चा करण्यात आली.

आवश्य वाचा : शरद पवारांना आमदार जगताप भेटले, महापाैराबाबत काय झाली चर्चा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख