भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या; दहशतवाद्यांनी घरात घुसून केला गोळीबार 

राकेश पंडिता यांना सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक पुरवण्यात आले होते.
 Rakesh Pandita .jpg
Rakesh Pandita .jpg

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नगरसेवक असणारे राकेश पंडिता त्राल मित्राची घरी असताना दहशतवादी घरात घुसले आणि गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राकेश पंडिता (Rakesh Pandita) यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारात आसिफा मुश्ताक नावाची एक महिला जखमी झाली आहे. या महिलेवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. (BJP leader shot dead)

काश्मीर पोलिसांनी ट्विट करत घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की राकेश पंडिता यांना सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक पुरवण्यात आले होते. तसेच त्यांना श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, त्राल मित्राच्या घरी जाताना सुरक्षा सोबत घेऊन गेले नव्हते. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसर सील करण्यात आला असून शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाकडून निवेदन प्रसिद्ध करत शोक व्यक्त करण्यात आला आहे.  राकेश पंडिता यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे ऐकून दु:ख झाले. या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. संकटाच्या काळात आमच्या वेदना कुटुंबासोबत आहेत, असल्याचे सिन्हा म्हणाले आहेत. 

माजी मुख्यमंत्री व पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी ट्वीट करत या हल्ल्याचा निषेध केला. त्या म्हणाल्या अशा हिंसाचारामुळे जम्मू काश्मीरला फक्त वेदना मिळता. राकेश पंडिता २०१८ मध्येझालेल्या महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या पक्षांनी स्थानिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com