जिहे-कठापूरचे पाणी वंचित गावांनाही मिळणार; १३० कोटींच्या आराखड्यास जलसंपदामंत्र्यांची मान्यता....

ऑगस्ट महिना अखेर जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर धरणात सोडण्याचे नियोजन केले गेले असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
130 crore fund for villages deprived of Jhee-Kathapur scheme ....
130 crore fund for villages deprived of Jhee-Kathapur scheme ....

विसापूर : जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील विसापूर, जाखणगाव, जांब, गादेवाडीला उचलून पाणी देण्याऐवजी बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणी देणे आणि या योजनेपासून वंचित असणाऱ्या उत्तर खटाव तालुक्यातील मोळ, डिस्कळ, ललगुण, वेटणे, रणसिंगवाडी, निढळसह पंचक्रोशीतील प्रत्येक गावांना पाणी देण्याच्या प्रारूप आराखड्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता देऊन १३० कोटी निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. 130 crore fund for villages deprived of Jhee-Kathapur scheme ....

सातारा येथील विश्रामगृहात आमदार शशिकांत शिंदे व जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे अधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता निकम, वेटणे गावचे उपसरपंच महेंद्र नलवडे, संजय नलवडे, अमृत नलवडे, खेडचे माजी सरपंच विजय शिंदे यांच्यासह उत्तर खटाव मधील कार्यकर्ते उपस्थित होते.

जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या पहिला टप्पा पूर्ण होऊन नेर तलावात तातडीने पाणी यावे यासंबंधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातारा येथे १७ जून २०२०, तीन नोव्हेंबर २०२० तर मुंबई येथे  २५ मे २०२१ रोजी बैठका पार पडल्या. यावेळी शशिकांत शिंदे यांनी जिहे-कठापूर योजनेच्या
सद्यस्थितीची माहिती  मंत्री जयंत पाटील यांना दिली. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करुन योजनेचे पाणी नेर धरणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामांची माहितीही त्यांना दिली.

लाभक्षेत्रात येणाऱ्या तसेच नव्याने समावेश करण्यात येणाऱ्या  गावांना उचलून पाणी देण्याऐवजी बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्यात यावे असा प्रस्ताव आमदार शिंदे यांनी मांडला. त्यावर मंत्री पाटील यांनी जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना सर्व्हे करण्याच्या सुचना दिल्या. आणि या कामासाठी लागणारा १३० कोटींचा निधी मंजूर केला. आमदार शशिकांत शिंदे यांनी जलसंपदा मंत्री असताना जिहे-कठापूर योजनेच्या कामांना लागणारा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे योजनेची बहुतांशी कामे मार्गी लागल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

जिहे-कठापूर येथे कृष्णा नदीवरील बॅरेजचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. वर्धनगड येथील बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले असून नेरच्या पहिल्या टप्प्यासाठी लागणाऱ्या तीन पंप हाऊसचे काम देखील पूर्णत्वास गेले आहे. ऑगस्ट महिना अखेर जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर धरणात सोडण्याचे नियोजन केले गेले असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

नेर उपसा एक योजनेतील शिंदेवाडी, ललगुण, नागनाथवाडी, शिंपीमळा, पवारवाडी, चव्हाणवाडी, विसापूर, जाखणगाव, गादेवाडी, कोकराळे, भोसरे, लोणी,धकटवाडी तसेच नेर उपसा दोनमधून बुध, काटेवाडी, फडतरवाडी, धावडधरे, उंबरमळे, निढळ, शिंदेवाडी, कटगुण, धारपुडी, दरजाई, दरुज, पवारवाडी, भुरकवडी आणि पेडगाव या गावांना बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मोळ, मांजरवाडी, चिंचणी, डिस्कळ, पांढरवाडी, काळेवाडी, अनपटवाडी या गावांचाही योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्याचा आणि दरजाई तलाव भरुन घेण्याचा प्रस्ताव शशिकांत शिंदे यांनी मांडला. त्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com