माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पूत्र सलिल ईडीच्या रडारवर  - Former Home Minister Anil Deshmukh son Salil will be issued ED summons | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पूत्र सलिल ईडीच्या रडारवर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

तपासात जमीन खरेदी करणारी कंपनी ही सलील देशमुख चालवत असल्याचं समोर आले आहे.  

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख यांना ईडीकडून लवकरच समन्स जाण्याची शक्यता आहे. सलील देशमुख यांच्या कंपनीने उरण तालुक्यात खरेदी केलेल्या करोडो रुपयांच्या जमिनीचा तपास ईडीने सुरू केला.Former Home Minister Anil Deshmukh son Salil will be issued ED summons

उरण तालुक्यातील धुटूम गावात सलील देशमुख यांची गुंतवणुक असलेल्या प्रीमियर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 15 प्लॉट खरेदी केले आहेत. ज्यांची किंमत 300 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची शक्यता आहे. ही जागा 8.3 एकर इतकी असून पळस्पे फाटा ते जेएनपिटी या परिसरात आहे. ईडीकडून सुरू असलेल्या तपासात जमीन खरेदी करणारी कंपनी ही सलील देशमुख चालवत असल्याचं समोर आले आहे.  त्याअनुषंगाने लवकरच त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

निंलबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने देशमुखांना बार मालकाकडून वसूल केलेले 4 कोटी 70 लाख रुपये दिले, देशमुख म्हणजेच नंबर 1होते असे वाझेने ईडीच्या चौकशीत सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.  बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टी या दोघांनीही गुड लक मनी म्हणून डिसेंम्बर महिन्यात 40 लाख वाझेला दिले होते, जे देशमुखांना गेले असंही वाझेने ईडी चौकशीत मान्य केलं असल्याचे सुत्रांनी सांगितलं. 

ईडीने आतापर्यंतच्या तपासात 50 ते 60 करोड रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे.  काही पैसे हे वाझे सीआययुमध्ये करत असलेल्या हायप्रोफायईल प्रकरणांच्या तपासादरम्यान जमवण्यात आल्याचाही ईडीला संशय आहे.  ईडीने कोर्टाची परवानगी घेऊन तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाझेची चौकशी केली. ज्या चौकशीदरम्यान वाझेने या गोष्टी सांगितल्या आहे. 

शिवसेनेला मोठे खिंडार..बड्या नेत्याचा आज काँग्रेस प्रवेश
 मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख,  ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आरोग्य समितीचे सभापती गटनेता सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळा मामा) आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख