कामात हलगर्जीपणा केल्याने अभियंता सक्तीच्या रजेवर, ऊर्जामंत्री तनपुरेंचा दणका

बैठकीत तालुक्यातील ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी महावितरणच्या भोकर वीज उपकेंद्राचे सहायक अभियंता प्रल्हाद टाक यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत तक्रारी केल्या.
prajakt tanpure 1.jpgprajakt tanpure 1.jpg
prajakt tanpure 1.jpgprajakt tanpure 1.jpg

श्रीरामपूर : महावितरण कंपनीचे येथील सहायक अभियंता प्रल्हाद टाक (Pralhad tak) यांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली. कारवाईची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु तनपुरे यांच्या यंत्रणेमार्फत कारवाईची माहिती उघडकीस आली. (Engineer on compulsory leave due to negligence in work, Energy Minister Tanpur hit)

महावितरणच्या येथील विभागीय कार्यालयात राज्यमंत्री तनपुरे शुक्रवारी (ता. ९) आयोजित बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन विविध समस्या जाणून घेतल्या. बैठकीत तालुक्यातील ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी महावितरणच्या भोकर वीज उपकेंद्राचे सहायक अभियंता प्रल्हाद टाक यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत तक्रारी केल्या. त्याची तत्काळ दखल घेत तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशानुसार सहायक अभियंता टाक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली.

दरम्यान, महावितरणचे उपअभियंता अमित कांबळे यांच्याकडे आज कारवाईबाबत माहिती विचारली असता त्यांनी कारवाईचे कारण सांगणे टाळले, तर तनपुरे यांच्या आदेशानुसार सहायक अभियंता प्रल्हाद टाक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केल्याच्या माहितीला कार्यकारी अभियंता थोरात यांनी दुजोरा दिला.

हेही वाचा..

 डंपरचा पाठलाग करताना तहसीलदार, प्रांत बचावले

राहुरी : विनापरवाना मुरमाची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग करताना तहसीलदार व प्रांताधिकारी बालंबाल बचावले. डंपरचालकाने अचानक भर रस्त्यात मुरूम ओतला. पाठलाग करणाऱ्या तहसीलदारांच्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावला. क्षणाचा विलंब झाला असता, तर तहसीलदारांचे वाहन मुरमाखाली दाबले असते.

तहसीलदार फसियोद्दीन शेख (वय ३३) यांच्या फिर्यादीवरून लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी हल्ला केला. शासकीय मालकीचा मुरूम चोरी केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डंपरचालकाला लोकेशन देणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. प्रवीण सुदाम जाधव (रा. शिंगवे, ता. नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हर्षल शिंदे व टर्बो मामा (दोघांची पूर्ण नावे समजली नाही) (दोघेही रा. नांदगाव, ता. नगर) अशी पसार झालेल्यांची नावे आहेत.

शनिवारी (ता. १०) दुपारी वांबोरी फाट्यानजीक उंडे नर्सरीजवळ तहसीलदार फसियोद्दीन शेख व प्रांताधिकारी दयानंद जगताप थांबले होते. त्यांना, मुरूम भरलेला विनाक्रमांकाचा एक डंपर वेगाने चाललेला दिसला. शेख यांनी डंपरचालकाला हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केल़ परंतु, त्याने डंपर धामोरीच्या रस्त्याने वळवला.
तहसीलदार शेख व प्रांताधिकारी जगताप यांनी शासकीय वाहनातून डंपरचा पाठलाग केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच डंपरचालकाने अचानक मागील बाजूचे फाळके वर करून डंपरमधील मुरूम रस्त्यावर ओतला. तहसीलदारांच्या वाहनचालकाने तत्काळ ब्रेक लावल्याने, तहसीलदार, प्रांताधिकारी व वाहनचालक बालंबाल बचावले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com