हे तीन भोसले भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे निमंत्रित सदस्य

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजपच्या सातारा शहर शाखेतर्फे अध्यक्ष विकास गोसावी यांनी पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार केला.
Madan Bhosale, MP Udyanraje Bhosale, Dr. Atul Bhosale
Madan Bhosale, MP Udyanraje Bhosale, Dr. Atul Bhosale

सातारा : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल  (शुक्रवारी)  पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी व कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, मदन भोसले व डॉ. अतुल भोसले यांची प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे.तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून भरत पाटील यांची तर सहकार सेलचे सहसंयोजक म्हणून शेखर चरेगावकर यांची नियुक्ती केली आहे.
 
भाजपची प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध सेलचे सहसंयोजकांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्ह्यातील पाच जणांना या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

प्रदेश कार्यसमितीच्या निमंत्रित सदस्यपदी खासदार उदयनराजे भोसले, मदन भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांची निवड केली आहे. प्रदेश कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून ऍड. भरत पाटील यांची निवड केली आहे, तसेच सहकार सेलचे सहसंयोजक म्हणून शेखर चरेगावकर यांची नियुक्ती झाली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजपच्या सातारा शहर शाखेतर्फे अध्यक्ष विकास गोसावी यांनी पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार केला. या वेळी सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, नगरसेवक विजय काटवटे, डी. जी. बनकर, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, संतोष प्रभुणे, युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम बोराटे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com