उदयनराजेंच्या जलमंदीरात मंत्री वडेट्टिवार यांनी चाखली सातारी मिसळ

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार हे शुक्रवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी चहाचे निमंत्रण दिले. त्यानुसार आपल्या दौऱ्यातून वेळ काढून मंत्री वडेट्टिवार हे जलमंदीर पॅलेसला पोहोचले. तेथे त्यांचे उदयनराजे भोसले यांनी शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदीपेढे देऊन सत्कार केला.
MP Udyanraje Bhosale with Minister Vijay Wadettiwar
MP Udyanraje Bhosale with Minister Vijay Wadettiwar

सातारा : मदत व पुनर्वसन मंत्री विज वडेट्टिवार यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटत कोणतीही राजकिय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांनी मला साताऱ्याची प्रसिद्ध भेळ खायला बोलावले होते, असे सांगितले. पण साताऱ्याची मिसळ प्रसिद्ध असल्याचे सांगताच भेळ नव्हे मिसळ खाल्ल्याचे त्यांनी सांगितले. साताऱ्याची मिसळ गोड लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
लोकसभा निवडणुकीपासून साताऱ्याची मिसळची चर्चा राज्यभर झाली आहे. सातारा लोकसभेच्या २०१९मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात भाजपकडून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी सातारा शहरात येऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत मिसळ खाली होती.

उदयनराजेंच्या विरोधात निवडणुक लढणाऱ्या उमेदवारासोबत शिवेंद्रसिंहराजेंनी मिसळ खाल्ल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मिसळीची चांगलीच राजकिय चर्चा रंगली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर पुन्हा एकदा सातारच्या सुप्रसिद्ध मिसळची चर्चा रंगली आहे. पण यावेळेस उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानात खालेल्या मिसळची.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार हे शुक्रवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी चहाचे निमंत्रण दिले. त्यानुसार आपल्या दौऱ्यातून वेळ काढून मंत्री वडेट्टिवार हे जलमंदीर पॅलेसला पोहोचले. तेथे त्यांचे उदयनराजे भोसले यांनी शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदीपेढे देऊन सत्कार केला. यानंतर दोन्ही नेत्यांनी मिसळ व चहापान केले. यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, सुनिल काटकर, नितीन भरगुडे पाटील उपस्थित होते.   

यावेळी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कोयना धरण व अभयारण्यग्रस्त लोकांच्या अनेक पिढ्यांपासून प्रलंबित पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत गांभीर्याने चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी निवेदनाद्वारे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन व मानव विकास संस्था (सारथी) च्या बाबतीत होत असलेल्या घटनांबाबत सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय  घ्यावा.

 समाजातील गरीब विद्यार्थ्यांना व संस्थेला न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली. यावेळी मंत्री वडेट्टिवार यांनी कोयना धरणग्रस्त व सारथी संस्थेच्या बाबतीत तातडीने दखल घेऊन शक्य तितक्या लवकर मंत्रालयीन स्तरावर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. 

यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री वडेट्टिवार यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली. तसेच या भेटीत काय चर्चा झाली? असे विचारले असता ते म्हणाले, की उदयनराजेंनी मला भेळ खायला आणि चहा प्यायला बोलावले होते.

साताऱ्याची भेळ प्रसिद्ध आहे, ती गोड लागली, असे त्यांनी सांगितले. पण साताऱ्याची मिसळ प्रसिद्ध आहे, असे पत्रकारांनी सांगितल्यावर ते म्हणाले, हो भेळ नव्हे मिसळ खाल्ली असं त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उदयनराजेंसोबत झालेल्या राजकीय चर्चेबाबतचा कोणताही खुलासा त्यांनी केला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com