
Khadakwasla News : खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द (ता. हवेली) गावच्या हद्दीत धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. पण दोन मुली बुडाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला येथील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत कलमाडी फार्म हाऊस जवळ काही मुली आल्या होत्या. आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. (Pune news)
पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. पण त्याच ठिकाणी काही स्थानिकही तिथे होते. मुलींची मदतचा आवाज आल्यानंतर स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली. नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले पण सोळा ते सतरा वर्षांच्या दोन मुलींचा शोध लागला नाही. (Pune Police)
स्थानिकांनी या घटनेची माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच खडकवासलाचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आणि पोलीस हवालदार दिनेश कोळेकरांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. (Pune Crime News)
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.