Kishor Aware Murder case Update: किशोर आवारेंच्या हत्येचा मुख्य सुत्रधार सापडला; आरोपींनी पोलिसांना दिली धक्कादायक माहिती

Maval Taluka Crime News : मावळात दीड महिन्यात झालेली ही दुसरी हत्या आहे.
Kishor Aware Murder case Update:
Kishor Aware Murder case Update: Sarkarnama

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware)  हत्या प्रकरणात आज पुन्हा मोठी अपडेट समोर आली आहे. किशोर आवारे यांची हत्येच मुख्य सुत्राधार सापडला आहे. या प्रकऱणी माजी नगरपरिषदेचे सदस्य भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे यांना अटक करण्यात आली आहे.

माजी नगरसेवक भानी खळदे यांचा मुलगा गौरव खळदे यानेच आवारे यांची हत्येचा कट रचल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. वडीलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी गौरव खळदे याने हा हत्येचा कट रचल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. काही महिन्यांपुर्वी माजी नगरसेवक भानू खळदे आणि  किशोर आवारे (Kishor Aware)  यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. याच रागातून गौरवने नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या आवारातच किशोर आवारे यांची हत्या घडवून आणली.

Kishor Aware Murder case Update:
Kishor Aware Murder case Update: किशोर आवारे हत्या प्रकरणात नवी अपटेड: न्यायालयाचे महत्वाचे आदेश

हत्येनंतर रात्रीच चार आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. त्यांना शनिवारी (१३ मे) त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहरे दिसल्याने मारेकरी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले होते. त्यांना काल न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. या पोलीस चौकशीत त्यांनी आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. (Kishor Aware news Update)

दरम्यान, या हत्येनंतर जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर गेल्या तीन-चार दिवसात या प्रकरणात नवनव्या घडामोडी समोर येत आहेत. (Pune Crime news)

आमदार सुनील शेळके यांनी किशोर आवारेंचा खून केल्याचा आरोप आवारेंच्या आईंने केला होता. याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. या पाच जणांची चौकशी केली असता त्यांनी पोलिसांसमोर मुख्य सुत्रधाराची माहिती दिली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com