Pune Police Driver Recruitment: पोलीस चालक भरती कौशल चाचणी ; पात्र ठरलेल्या ८७० उमेदवारांना..

Police Driver Recruitment 2021 : पोलिस चालक भरती-२०२१ साठी कौशल्य चाचणीसाठी पुणे शहर पोलिसांनी (pune police) त्यांच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे
Pune Police
Pune PoliceSarkarnama

Pune Police News: पोलीस चालक भरतीची महत्वाची बातमी असून पोलिस चालक भरती-२०२१ साठी कौशल्य चाचणीसाठी पुणे शहर पोलिसांनी (pune police) त्यांच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

संबधीत उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या तारखेस पहाटे ५.३० वाजता सीओईपी शिवाजीनगर या ठिकाणी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Pune Police
Solapur News : नंदेश्वरातील तिहेरी खून शेतीच्या बांधावरून; संशयिताने दिली कबुली

शहर पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलिस चालक भरती-२०२१ च्या कौशल्य चाचणीसाठी संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणीमध्ये ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी रिक्त पदाच्या १:१० या प्रमाणात वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या ८७० उमेदवारांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे शहर पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com