Ajit Pawar Baramati Sabha : माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना अजितदादांचा 'वादा'; म्हणाले...

Malegaon Sakhar Karkhana Baramati : अमित शाहांनी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बोजा कमी केला
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार शनिवारी पहिल्यांदाच बारामतीत आले होते. बारामतीकरांनी त्यांचे फुलांची उधळण करून जंगी मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने भारावलेल्या पवारांनी राज्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. तसेच बारामती आणि पुरंदरमधील जलसिंचन योजनांची दुरुस्ती करणार असल्याची ग्वाही दिली. यासह माळेगाव सहकारी कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा केली. (Latest Political News)

Ajit Pawar
Ajit Pawar Baramati Sabha : राज्याचे 'दादा' झाले भावूक; अजित पवारांच्या सभेत नेमकं काय झालं ?

कांदा निर्यातीवर केंद्राने लावलेल्या ४० टक्के शुल्कामुळे राज्यातील कांद्याचे दर कोसळले आहेत. यावर केंद्राच्या आदेशानुसार दोन लाख मेट्रिक टन कांद्याची २४१० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू असली तरी शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

यातच ऑक्टोबरपासून साखर निर्यादबंदी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे चर्चा आहे. अशा वातावरणात अजित पवारांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राज्यातील कारखान्यावरील साडेनऊ हजार कोटींचा कर माफ केला. हा कर माफ झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरीलच भार कमी केल्याची आठवणही करून दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar In Baramati : बारामती लोकसभेतील दोन प्रकल्पांबाबत अजितदादांचे मोठे विधान; म्हणाले, "तिजोरी हातात..."

बारामती तालुक्यात असलेल्या सोमेश्वर कारखान्याने सभासदांना ३३५० रुपये दर दिल्याचेही पवारांनी सांगून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे कौतुक केले. मात्र शेजारच्या माळेगाव कारखान्याचे सभासद शेतकरी नाराज असल्याचे बोलले जात होते. 'सोमेश्वर' ३३५० रुपये दर देऊ शकतो तर माळेगाव कारखाना का नाही देत, अशी दबक्या आवाजात चर्चा असल्याचे अजित पवारांनी स्पष्टच बोलून दाखवले.

'सोमेश्वर कारखाना ३३५० रुपये दर देत असला तरी आगामी काळात त्यांच्यापेक्षा जास्त दर माळेगाव कारखाना नक्कीच देईल. जास्त नाही दिला तरी एक रुपया तरी वाढवून देईल, याची मी हमी देतो', असा शब्दच अजित पवारांनी बारामती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिला.

Ajit Pawar
Ajit Pawar Baramati Sabha : मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार बारामतीत पुन्हा बोलले; "२००४ अन् २०१९ ला संधी होती, पण..."

दरम्यान, स्वागताला उत्तर देताना अजित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अजितदादांना भावना अनावर झाल्याचेही दिसून आहे. "मला कायम तुमच्या ऋणात राहायला आवडेल. तुमचे आभार मानून त्यातून मला मुक्त होण्याची अजितबात इच्छा नाहीत. त्यामुळे आपल्या लोकांचे मी आभार मानणार नाही", असे म्हणताना अजितदादांनी आवंढा गिळला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com