Ajit Pawar Baramati Sabha : राज्याचे 'दादा' झाले भावूक; अजित पवारांच्या सभेत नेमकं काय झालं ?

Baramati Vidhansabha : "बारामतीकरांमुळे उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम करून राज्याची सेवा करण्याची संधी"
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Pune Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि प्रशासकीय यंत्रणेवर धाक ठेवून 'दादागिरी' करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीकरांचे स्वागत स्वीकारताना मात्र अत्यंत भावूक झाले. बारामतीतील जंगी मिरवणुकीपासून सभेच्या ठिकाणी भाषण ठोकतानाही अजितदादा बारामतीकरांशी मनमोकळा संवाद साधून आपल्या भावना मांडल्या. 'मला तुमच्या ऋणातच राहायला आवडेल. आपल्या माणसांचे आभार मानणार नाही', असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले. यानिमित्ताने अजितदादा शनिवारी एका आगळ्या-वेगळ्या स्टाईलमध्ये दिसून आले. (Latest Political News)

बारामती मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) एक लाख ६५ हजार मतांधिक्यांनी निवडून येत आमदार झाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री राहिलेल्या पवारांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही तीच पदे देण्यात आली. यानिमित्त उपमुख्यमंत्रीपदाचा अजितदादांनी विक्रम केला आहे. यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात येत त्यांनी आज दिलखुलासपणे बारामतीकरांशी संवाद साधला. आपल्या लोकांशी बोलताना त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे काही वेळ ते स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले.

Ajit Pawar
Ajit Pawar Baramati Sabha : मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार बारामतीत पुन्हा बोलले; "२००४ अन् २०१९ ला संधी होती, पण..."

अजित पवारांनी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून एकदाही पराभव पाहिला नाही. प्रत्येकवेळी बारामती विधानसभा मतदारसंघातील लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यांच्या निर्णयांना पाठिंबाच दिल्याचे दिसून आले. त्यांना निवडून आणण्याची जाबाबदारी लोक घेत असल्याचे चित्र आजपर्यंत दिसून आलेले आहे. त्यामुळे अजित पवार राज्यभर बिनधास्तपणे काम करतात, असे बोलले जाते. हाच धागा पकडून बंडानंतर बारामतीला आलेल्या अजितदादांना भावना अनावर झाल्याचे दिसून आहे.

"मला कायम तुमच्या ऋणात राहायला आवडेल. तुमचे आभार मानून त्यातून मला मुक्त होण्याची अजितबात इच्छा नाहीत. तुमचे हे प्रेम मला स्फर्ति देणार ठरणार आहे. त्यामुळे आपल्या लोकांचे मी आभार मानणार नाही. यामुळे मला जोमाने काम करण्यास उर्जा मिळाली", असे म्हणताना अजितदादांनी आवंढा गिळला.

Ajit Pawar
Ajit Pawar In Baramati : बारामती लोकसभेतील दोन प्रकल्पांबाबत अजितदादांचे मोठे विधान; म्हणाले, "तिजोरी हातात..."

बारामतीकरांशी बोलताना अजित पवारांनी तालुक्यासह राज्याच्या विकासाचा आढावा घेतला. कधी नव्हे असे झालेल्या स्वागतामुळे ते भावूक झाले. बारामतीतील रस्ते फुलांच्या पाकळ्यांच्या सड्याने खूश झाले असतील. ही गर्दी प्रेमापोटी, उत्स्फूर्तपणे जमा झाली असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत. यावेळी गर्दीतून एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा छेडला. याची दखल घेत पवारांनी २००४ आणि २०१९ चे उदाहरण देत खंतही व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com