डबल मोक्का कारवाई झालेल्या गायकवाड कुटुंबाला 27 आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

डबल मोक्काखाली कारवाई झालेली पहिलीच केस..
डबल मोक्का कारवाई झालेल्या गायकवाड कुटुंबाला 27 आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी
Gaykwad pitaputra

पुणे : कर्नाटकातील उडपी येथून पकडण्यात आलेले आणि डबल मोक्का कारवाई झालेले नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaykwad) यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा गणेश (Ganesh Gaykwad) या तिघांचीही पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यातून कारवाई केली जात असल्याचा त्यांचा दावा फेटाळत न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Court gives seven days police custody to Gaykwad family)

अध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून सुनेचा छळ करण्याबरोबरच तिच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग तसेच खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. या तिघांना न्यायालयाने २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (वय ७०), नंदा नानासाहेब गायकवाड(वय ६५) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोक्कानुसार दोनदा कारवाई झालेले गायकवाड बाप-लेक फरार झाले होते. पुणे पोलिसांनी त्यांना बुधवारी (ता. १९) कर्नाटक येथून अटक केली आहे. त्यानंतर बाप-लेकासह नंदा यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली होती. आरोपींकडून तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी धमकावून काही जमिनींचा ताबा घेतला आहे, असे कावेडिया यांनी न्यायालयास सांगितले.

गायकवाड यांच्यावर राजकीय वैमनस्यातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सुनेचे सासरच्यांबरोबर पटत नव्हते. त्यामुळे तिच्या परिवाराने हे गुन्हे दाखल करण्यासाठी यंत्रणेवर दबाव टाकला आहे, असा युक्तिवाद गायकवाड यांच्यावतीने . विपुल दुशिंग यांनी केला. या प्रकरणातील मीळ फिर्यादीतर्फे . पुष्कर दुर्गे यांनी कामकाज पाहिले.  
सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in