खासदार जाधव यांचे राष्ट्रवादीला पुन्हा आव्हान; जिल्हा परिषदेसह महापालिकेवरही भगवाच..

इच्छाशक्ती व संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आपण हे करू शकतो, असेही ते म्हणाले.
खासदार जाधव यांचे राष्ट्रवादीला पुन्हा आव्हान; जिल्हा परिषदेसह महापालिकेवरही भगवाच..
Shivsena Mp Sanjay jadhav News Parbhani

परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण करा, येत्या निवडणुकीत परभणी महापालिकाच काय तर जिल्हा परिषदेवरही  भगवा फडकविल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला. (Now saffron will fall on Zilla Parishad as well as Municipal Corporation) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात जाधव यांनी चांगलीच रंगत आणली.

राष्ट्रवादीला कधीही बूडवू या त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली होती. या शिवाय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदली प्रकरणात देखील जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केल्याची कबुली त्यांनी नुकतीच दिली होती. (Shivsena Mp Sanjay Jadhav Parbhani) या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यात ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गोरगरीबांचे दु:ख वाटून घेण्यासाठी शिवसेना उदयास आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराचा वारसा शिवसैनिक पुढे नेत आहेत.

शिवसैनिकांनी समाज हिताचे काम करत असतांना कधीही परिणाम, दुष्परिणामाची पर्वा केली नाही. त्यामुळेच शिवसेनेचा वृक्ष आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या सावलीत बसणे खुप झाले. आता मैदानात उतरावे लागणार आहे, असे आवाहन जाधव यांनी शिवसैनिकांना केले.  २०२२ च्या जिल्हा परिषद व परभणी महापालिकेच्या निवडणुकीत एकदिलाने काम करून या दोन्ही ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली पाहिजे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मनात जिंकण्याची जिद्द ठेवली आहे आणि ती पूर्ण करणारच आहोत. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आम्हीच सत्तेत असणार आहोत, आमची जिल्हाभर ताकद आहे असा दावा करतांनाच विरोधकांची तेवढी ताकद नाही. पंरतू स्वतःची ताकद ओळखून कामे करावी लागेल असे आवाहनही जाधव यांनी केले. इच्छाशक्ती व संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आपण हे करू शकतो, असेही ते म्हणाले.

तर तुमच्यासह अन्यथा...

खासदार संजय जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात परत एकदा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसला लक्ष केले. ते म्हणाले, आम्ही जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार म्हटले की, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पायाखालची वाळू सरकते. ही निवडणुक स्वबळावर लढण्यास आम्ही समर्थ आहोत. तुम्ही आले तर तुमच्यासह अन्यथा तुमच्या शिवाय असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेत म्हणीचा वापर वारंवार केला जातो. पंरतू घनसावंगी (जि.जालना) येथील मेळाव्यात बोलतांना त्यांनी भाषणात वापरलेल्या काही म्हणीमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे जाधव यांनी बुधवारी झालेल्या परभणीतील संवाद मेळाव्यात  म्हणी वापरणे देखील जीवावर येत असल्याचे सांगताच सभागृहात एकच हश्या पिकला. व्यासपीठावर जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख विशाल कदम, राम पाटील, अर्जून सामाले, सखुबाई लटपटे आदींची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in