राणेंची ही जन आशीर्वाद यात्रा नसून जनतेचा छळ!

महापैार किशोरी पेडणेकर यांनी राणेंच्या या यात्रेवर टीका केली आहे.
Sarkarnama.jpg
Sarkarnama.jpg

मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ झाला आहे. शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या ठिकाणी आज रात्री आठ वाजेपर्यंत राणे यांचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शनही घेतलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्याचा नारायण राणे यांना कोणताही अधिकार नाही असं म्हणत शिवसैनिकांनी आक्षेप घेतला होता. मुंबई महापालिकेच्या महापैार किशोरी पेडणेकर यांनी राणेंच्या या यात्रेवर टीका केली आहे. 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ''राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, कारण ही जन आशीर्वाद यात्रा नसून जनतेचा छळ आहे. आज तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदींही सुध्दा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकित केले आहे. सध्या आपण अॅनलॅाकमध्ये चाललो आहे. हळूहळू आपण नियम शिथिल करीत आहोत. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी एकत्र यावं आणि तिसऱ्या लाटेला आमंत्रण द्यावे. मुंबईकर  लोक स्वतःला सांभाळत आहेत. गर्दीला ते टाळत आहेत.'' 

''केंद्रीय मंत्री आपल्या राजकीय हव्यासापोटी हजारों लोकांची गर्दी करीत आहेत. हा नासमजपणा लोकांना दिसत आहे. आपण केंद्रीय मंत्री आहात. केंद्रात अनेक कामे आहेत. अनेकांना न्याय द्यायचा आहे. ते सोडून एक मुंबई महापालिका जिंकण्यासाठी हे तांडव चालले आहे, हे कशासाठी ? मुंबईसाठी आम्ही जर काहीच केले नसेल तर मुंबई नंबर वनवर आली कशी, मुख्यमंत्री ठाकरे हे देशातील मुख्यमंत्र्यामध्ये अव्वल क्रमांकावर आले कसे, या प्रश्नांचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. जन आशीवार्द यात्रेमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात घालू नका, ही हात जोडून विंनती,'' असे पेडणेकर म्हणाल्या.    

''ज्या मुख्यमंत्र्यांबाबत तुम्हा बोलतात ते देशात अव्वल नंबर ठरले आहेत. कोरोनात मुंबईत आपलं काम उत्तम केल्याचे दाखवून दिले आहे. कोणतीही निवडणूक कठिणचं असते, कठिण पेपर सोडविण्याची सवय शिवसेनेला आहे. ते म्हणतात, 'पापाचा घडा फोडायचा आहे,' त्यांना त्यांच्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत पापाचा घडा दिसला नाही का,'' असा सवाल पेडणेकर यांनी यावेळी उपस्थित केला.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com