भाजपचे बहुमत असलेल्या नगरपरिषदेत शिवसेनेचे उपनराध्यक्ष बिनविरोध

नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर हे गावकी, भावकीचे राजकारण रंगले.
Shivsena Leader will be the Deputy Mayor of Alandi Municipal Council
Shivsena Leader will be the Deputy Mayor of Alandi Municipal Council

पिंपरी : गेल्या महिन्याभरात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांची जेलवारी झाली. त्यातील एक नगरसेविका अद्याप तुरुंगात आहेत. या घटनांतून शहराच्या राजकारणातील व त्यातही पालिकेतील गावकी, भावकीचा प्रत्यय आला. पिंपरी पालिकेसारखाच ग्रामीण बाज असलेल्या लगतच्या आळंदी नगरपरिषदेतही हे नात्यागोत्याचे राजकारण दिसले. (Shivsena Leader will be the Deputy Mayor of Alandi Municipal Council) 

आळंदी नगरपरिषदेत भाजपचे स्पष्ट बहूमत आहे. तरीही तेथे उपनगराध्यक्ष हा शिवसेनेचा झाला. भाजपने उपनराध्यक्षपदासाठी उमेदवारच दिला नव्हता, हे विशेष. त्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला. उमेदवार न देण्याची खेळी हुशारीने खेळण्यात आली. त्यामुळे क्रॉस व्होटिंगचा प्रश्नच उरला नाही. व्हिप डावलला गेला नाही. परिणामी कारवाईचा प्रश्न निर्माण  झाला नाही. 

नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर हे गावकी, भावकीचे राजकारण रंगले. उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे आदित्य घुंडरे यांची बिनविरोध निवड झाली. मागील विधानसभेला घुंडरे यांनी भाजपचे बंडखोर अतुल देशमुख यांना मदत केली होती. त्याची काहीअंशी परतफेड झाल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली. दरम्यान भाजपाकडे पूर्ण बहूमत असूनही शिवसेनेचा उपनगराध्यक्ष असल्याने येथील छुपी युतीही उघड झाली. त्यामुळे राज्यात एकमेकांचे सध्या कट्टर विरोधक झालेले शिवसेना, भाजप हे दोघे आळंदीत सत्ता एकत्र उपभोगणार आहेत. 

नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर या भाजपच्या आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ऑनलाईन निवडणूक झाली. भाजपचे दहा, सेनेचे सहा आणि दोन अपक्ष असे आळंदीत पक्षिय बलाबल आहे. म्हणजे भाजपचे पूर्ण बहूमत असूनही पडद्यामागे ब-याच हालचाली झाल्या आणि घुंडरे बिनविरोध निवडून आले. नगराध्यक्षपद राखीव असून ते जनतेतून निवडून आले आहेत. तर, उपनगराध्यक्षा पारुबाई तापकीर यांचा काही दिवसांतच राजीनामा घेतल्यानंतर हे रिक्त झाले होते. 

घुंडरे यांचा एकमेव अर्ज आला होता. बहूमत असुनही भाजपकडूनच या पदासाठी अर्ज भरला गेला नाही. सर्व ठरवून होते. आमचं ठरलंय याप्रमाणे पक्षनिष्ठा बाजूला ठेवून भावकी आणि नात्यागोत्याचे राजकारण पुन्हा शिजले. घुंडरेंना भाजपचे नगरसेवक सचिन गिलबिले, प्रशांत कुर्‍हाडे, मिरा पाचुंदे, सागर बोरुंदि यांनी साथ दिली. परिणामी नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना आणि भाजप यांनी ऐनवळी एकत्र येवून उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध पार पाडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com