राष्ट्रवादीच्या नेत्याच्या अंत्ययात्रेला गर्दी; 50 जणांवर गुन्हा दाखल

व्हीआयपी मंडळींच्या अंत्ययात्रेत सर्रास नियमांचे उल्लंघन
gaffar malik
gaffar malik

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक (NCP`s minority cell ex chief Gaffar Malik) यांच्या अंत्ययात्रेत उसळलेल्या गर्दीप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन दिवसांनी हा गुन्हा दाखल झाला.

हाजी गफ्फार मलिक यांचे 24 रोजी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर 25 रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलीस प्रशासनाने  ५० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात गफ्फार मलिक यांचे पूत्र एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गिरीश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.


जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने शनिपेठ पोलिस स्टेशन ला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतययात्रेदरम्यान जी गर्दी झाली त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

काॅंग्रेसचे नेेते राजीव सातव यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही अशीच गर्दी झाली होती. त्यावेळी हिंगोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळले होते. या अंत्यायात्रेला राज्य सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या वेळी केवळ वीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. याची कल्पना असूनही अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन होत असते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com