राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते गफ्फार मलिक यांचे निधन - ncp former state minority president gaffar malik passes away | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते गफ्फार मलिक यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

गफ्फार मलिक हे जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक होते.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस  NCPअल्पसंख्याक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफार मलिक Gaffar Malik (वय ६७) यांचे आज रात्री साडे दहा वाजता हृदयविकारामुळे निधन झाले. गफ्फार मलिक हे जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. गफार मलिक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar,नवाब मलिक Nawab Malikयांनी दुःख व्यक्त केलं आहे.  ncp former state minority president gaffar malik passes away

नगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद त्यानी भूषविले. जळगावातील अँग्लो उर्दू हायस्कूलचे ते चेअरमन होते. तर ईकरा एजूकेशन सोसायटीचे सचिव होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी रावेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. माजी आमदार सुरेशदादा जैन यांचे ते एकेकाळी अत्यंत निकटचे सहकारी म्हणून ओळखले जात होते.

आमच्यात सर्व आलबेल..मागच्या सरकासारखी नळावरील भांडणे नाहीत.पटोलेंचे स्पष्टीकरण.. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख गफ्फार मलिक यांचे निधन दुःखदायक आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालीम-ए-अंजुमन मुसलमीन व इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्चशिक्षणासाठी व औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले. कोविडकाळात आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वयमान विसरून समाजसेवा केली.
त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात  शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक  यांनी ट्वीट करत गफ्फार मलिक यांच्याबाबत दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीचे राज्य अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिकजी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख वाटलं, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे. माझ्या संवेदना त्यांचे कुटुबीय आणि मित्रपरिवारासोबत आहे, असंही ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख