पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत राडा : उद्धव ठाकरे आणि पवारांपर्यंत तक्रारी

सभापती अविश्वास ठरावावरून दोन्ही पक्षांत तणाव...
Uddhav thackray-sharad pawar
Uddhav thackray-sharad pawar

राजगुरूनगर :  खेड तालुका पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर (no confidence motion agaisnt Khed Panchayat Samiti Chairman Bhawan Pokharkr) यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावानंतर राजकीय वातावरण चिघळले असून सभापती व समर्थकांकडून पंचायत समिती सदस्य व पतींना, ते सहलीवर असलेल्या डोणजे येथील रिसॉर्टमध्ये घुसून मारहाण करण्यात आली आहे. (Bhagwan Pokharka attacks own party members in resort at Donaje) या साऱ्या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे हे दोघे आता काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (clash between NCP and Shiv Sena in Pune district and Complaints to Uddhav Thackeray and Pawar)

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे या संदर्भात `मातोश्री`वर जाणार असून घडलेला सर्व प्रकार नेत्यांच्या कानावर घालणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकमेकांचे सदस्य न फोडण्याचे संकेत ठरला होता. मात्र तसे न घडल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या सदस्यांमध्येच नाराजी असल्याने त्यांनी आपल्याच सभापतीविरोधात अविश्वास आणल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या संदर्भात आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी बोलत आहेत. 

खेड पंचायत समितीचे सभापती शिवसेनेचे भगवान पोखरकर यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला असून ठरावावर मतदान घेण्यासाठी ३१ मे रोजी पंचायत समिती सदस्यांची सभा बोलाविण्यात आलेली आहे. 
शिवसेनेच्याच सदस्या सुनीता सांडभोर या अविश्वास ठरावाच्या सूचक आहेत. ठरावावर एकूण १४ पैकी ११ सदस्यांच्या सह्या आहेत. त्यांमध्ये शिवसेनेचे ६, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४ आणि भाजपचे एकमेव सदस्य व विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांचा समावेश आहे.

अविश्वास ठराव दाखल करून हे सर्व ११ जण अज्ञातस्थळी रवाना झाले होते. खेड पंचायत समितीत शिवसेनेकडे पूर्ण बहुमत असतानादेखील सभापतींवर त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी बंड करीत अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार व भाजपच्या एका सदस्याचा पाठिंबा आहे. आपसात ठरलेली तडजोड पाळून राजीनामा न दिल्यामुळेच त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याची चर्चा आहे. या घडामोडीमागे तालुक्यातील मोठ्या नेत्याचा हात असल्याचे वृत्त `सरकारनामा`ने  दिले होते, तसेच आता घडताना दिसत आहे. हा नेता म्हणजे खेडचे आमदार दिलीप मोहिते असल्याचे बोलले जाते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सेनेचे सदस्य फुटण्याशी माझा संबंध नाही. मात्र आमच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांचे संरक्षण करण्यासाठी मी त्यांना एका रिसाॅर्टवर ठेवले होते. तेथे येऊन पोखरकरांनी गोळीबार केला, असा आऱोप मोहिते यांनी केला.

आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी आपल्यावर अविश्वास आल्यामुळे चिडलेल्या सभापतींनी हे ११ सदस्यांचे अज्ञातस्थळ शोधून काढले. हे सर्वजण हवेली तालुक्यातील डोणजे येथील एका रिसॉर्टवर थांबलेले होते. हे रिसॉर्टही खेड तालुक्यातील बड्या राजकीय हस्तीचेच आहे. तेथे स्वतः सभापती भगवान पोखरकर त्यांचा भाऊ व त्यांच्या समर्थकांनी महिला सदस्यांना व त्यांच्याबरोबर असलेल्या काहीजणींच्या पतींना मारहाण केली. पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची ही धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहेत. 

पोखरकर हे पक्षश्रेष्ठींना विचारून राजीनामा देणार होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने फूस दिल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. त्यामुळे पोखरकर व पक्षाची मानहानी झाली, असे पोखरकरांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.  पंचायत समिती निवडणुकीला अवघे आठदहाच महिने राहिलेले असताना हे नाट्य घडल्याने तालुक्याला गालबोट लागले आहे. खेड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे राजकारणाने हिंसक वळण घेतले आहे. या घटनेचा ३१ तारखेच्या अविश्वास ठरावावर काय परिणाम होणार आणि सभापती पोखरकरांवर काय कारवाई होणार, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com