विश्‍वास नांगरे पाटलांसमोर आजीबाईंनी नेत्यांना सुनावले...गणपतीत 'डाॅल्बी' नका लाऊ रे बाबांनो! 

गणेशोत्सवाच्या तयारीची धुम सुरु आहे. त्यात सिडकोचा परिसर म्हणजे सर्वच पक्षाच्या नेत्यांची मांदीयाळी. त्यात वर निवडणुकांची हवा. त्यामुळे राजकीय नेते मंडळीत गणपतीची चढाओढ सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी बैठक बोलावली. ती सुरु असतांनाच आकस्मिकपणे एक 65 वर्षाच्या आजी जिजाबाई माळी यांनी माईक हातात घेत, नेत्यांना सुनावले. "तुम्ही माझ्या नातवांसारखे. गणपतीत डॉल्बी नका वाजवू रे बाबांनो. लई त्रास होतो.'' त्यांच्या या विनंतीने नांगरे -पाटीलही आवाक होऊन पहातच राहिले.
Old Lady Requests Ganesh Mandals Not to Play DJ
Old Lady Requests Ganesh Mandals Not to Play DJ

नाशिक : गणेशोत्सवाच्या तयारीची धुम सुरु आहे. त्यात सिडकोचा परिसर म्हणजे सर्वच पक्षाच्या नेत्यांची मांदीयाळी. त्यात वर निवडणुकांची हवा. त्यामुळे राजकीय नेते मंडळीत गणपतीची चढाओढ सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी बैठक बोलावली. ती सुरु असतांनाच आकस्मिकपणे एक 65 वर्षाच्या आजी जिजाबाई माळी यांनी माईक हातात घेत, नेत्यांना सुनावले. "तुम्ही माझ्या नातवांसारखे. गणपतीत डॉल्बी नका वाजवू रे बाबांनो. लई त्रास होतो.'' त्यांच्या या विनंतीने नांगरे -पाटीलही आवाक होऊन पहातच राहिले. 

एव्हढ्यावर न थांबता त्या म्हणाल्या, "गणेशोत्सवासह सर्वच उत्सवांत, धार्मिक कार्यक्रमांत डॉल्बीचा वापर करू नये. सर्वच प्रकारचे नियम पाळावे. पोलिसांना सहकार्य करावे. व्यसने टाळा, महिला, भगिनींना योग्य सन्मान द्या, जुगार खेळणे टाळा. सक्तीने वर्गणी गोळा करू नका व मिळालेल्या वर्गणीचा सदुपयोग करावा. त्यासाठी पोलीस आयुक्तालयासह विविध पोलिस ठाण्यांमध्ये सध्या शांतता कमिटीचे आयोजन करावे. मंडळांनी शांततेत सण साजरे करावेत.'' 

आजीबाईंचे अनपेक्षीत भाषण व ते सर्व एव्हढे अचानक झाले की यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांत तर अस्वस्थता पसरली. इच्छा असुनही पोलिस आयुक्तच उपस्थित असल्याने त्यांना आजीबाईंचा ध्वनीक्षेपकही बाजुला करता येईना. समोर तर सर्व पक्षांची नेते मंडळी होती. त्यांनाही आजीबाईंच्या डोसामुळे थोडेसे अस्वस्थच वाटू लागले होते. स्वतः आयुक्त नांगरे-पाटील सुरवातीला या आजीबाई काय बोलणार या शंकेने चिंता वाटू लागली होती. त्यानंतर मात्र हे सगळेच शांततेत निवळले. आयुक्तांसह सर्व पोलिस अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते आजींच्या सुचनेने निशब्द झाली होती. 

त्यानंतर आयुक्त नांगरे-पाटील यांनी त्या आजींचे कौतुक केले. तेच सुत्र पकडून ते म्हणाले, ''मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जर खरोखर चांगल्या व योग्य पद्धतीने वागल्यास भविष्यात पोलिस तुमच्याकडून ठेवत असलेल्या अपेक्षांची गरज पडणार नाही,'' यावेळी उपायुक्त खरात, पोलीस सहआयुक्त शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद वारकरी, नगरसेवक मुकेश शहाणे, नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी, गणेश मंडळ, दहीहंडी मंडळ, सामाजिक कार्यकर्ते आदींसह शांतता कमिटी सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com