ताकद आणि स्वातंत्र्य देण्याची 'शिंदेशाही'ची शरद पवारांकडे मागणी 

पक्षप्रवेश आणि विधानसभा उमेदवारीसाठी ताकद आणि स्वातंत्र्य देण्याची अट प्रसिद्ध गायक शिंदेशाहीतील डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टाकली आहे.पवार यांच्या बरोबर त्यांच्या 'रॉयलस्टोन' या निवासस्थानी तासभर चर्चा झाल्याचे डॉ. उत्कर्ष यांनी सांगितले.
ताकद आणि स्वातंत्र्य देण्याची 'शिंदेशाही'ची शरद पवारांकडे मागणी 

पिंपरी : पक्षप्रवेश आणि विधानसभा उमेदवारीसाठी ताकद आणि स्वातंत्र्य देण्याची अट प्रसिद्ध गायक शिंदेशाहीतील डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टाकली आहे. गुरुवारी (ता.२२) रात्री मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच्या वन टू वन बैठकीत ही मागणी केल्याचे डॉ. शिंदे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

दरम्यान, मी जातीचे राजकारण करीत नसल्याने वंचितकडून लढण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत मी वंचितकडून लढणार असल्याचे एका वेबपोर्टलने दिलेले वृत्त (सरकारनामा नव्हे) पूर्ण चुकीचे व निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पवार यांच्या बरोबर त्यांच्या 'रॉयलस्टोन' या निवासस्थानी तासभर चर्चा झाल्याचे डॉ. उत्कर्ष यांनी सांगितले. लोकसभेलाही राष्ट्रवादीने मंगळवेढ्यातून लढण्याची ऑफर दिली होती. मात्र, विधानसभेला इच्छुक असल्याचे त्यावेळी मी सांगितल्याने आता आमदारकीसाठी मला त्यांनी विचारले आहे, असे ते म्हणाले.

वन टू वन बैठकीनंतर सोमवारी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसमवेत पवार यांच्या उपस्थितीत दुसरी बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मला निव्वळ राजकारण करण्यासाठी राजकारणात जायचे नसून त्याव्दारे समाजाला मदत करायची असल्याने त्यासाठी ताकद आणि स्वातंत्र पाहिजे असल्याने त्याची मागणी आपण यावेळी केल्याचे त्यांनी सांगितले. पैसा, प्रसिद्धी असे सर्वकाही मिळाले असल्याने त्याकरिता राजकारणात जायचं नसून नुसते आमदार व्हायचं नाही,असे डॉ. उत्कर्ष म्हणाले. 

पार्थ पवार यांनीही आपल्याला हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे राजकारणात जायचंच ठरलं व निवडणूक लढविली, तर ती राष्ट्रवादीकडून लढेन, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. कारण शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांकडून खूप काही शिकण्यासारखे असेल, असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com