नाशिकमध्ये भाजपच्या मुलाखतींत इच्छुकांच्या महापुराने 'बंडा'ची चुणुक!

माजी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप हे शहरातले पक्षाचे सर्वेसर्वा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्‍वासु सहकारी. त्यांच्या मर्जीशिवाय पक्षात पानही हलत नव्हते. मात्र, विधानसभेच्या तोंडावर स्वतः गिरीश महाजनांनी सुत्रे हलविल्याने त्यांचे महत्व घटल्याचे चित्र आहे. इच्छुकांच्या मुलाखतीत तर ते प्रकर्षाने पुढे आले. त्यांच्या विरोधात तब्बल पंधरा जणांनी उमेदवारी मागितली. त्यात अगदी त्यांचे निकटवर्तीय आहेत.
Devyani Pharande - Vasant Gite  - Laxman Saoji
Devyani Pharande - Vasant Gite - Laxman Saoji

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती कालपासून सुरु झाल्या. मात्र त्यात इच्छुकांची संख्या एव्हढी वाढली की दुसऱ्या दिवशीही ती प्रक्रिया सुरुच राहिली. शहरातील भाजपच्या तिन्ही विद्यमान आमदारांऐवजी आम्हाला उमेदवारी द्या, अशी मागणी चाळीस नेत्यांनी केली. विशेष म्हणजे आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात दहा जणांनी उमेदवारी मागितली. त्यात पक्षाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि माजी आमदार वसंत गिते असल्याने फरांदेच्या मार्गात पक्षातूनच अडथळे निर्माण झाले आहेत.

माजी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप हे शहरातले पक्षाचे सर्वेसर्वा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्‍वासु सहकारी. त्यांच्या मर्जीशिवाय पक्षात पानही हलत नव्हते. मात्र, विधानसभेच्या तोंडावर स्वतः गिरीश महाजनांनी सुत्रे हलविल्याने त्यांचे महत्व घटल्याचे चित्र आहे. इच्छुकांच्या मुलाखतीत तर ते प्रकर्षाने पुढे आले. त्यांच्या विरोधात तब्बल पंधरा जणांनी उमेदवारी मागितली. त्यात अगदी त्यांचे निकटवर्तीय आहेत.

महापालिका गटनेते संभाजी मोरुस्कर आणि महापालिका स्थायी समितीचे सभापती उध्दव निमसे, प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे, सुनिल आडके, नगरसेवक अरुण पवार, हेमंत धात्रक हे त्यात आघाडीवर आहेत. याशिवाय स्वामी तुळशीराम गुट्टे, उत्तम उगले, कमलेश बोडके, सुनील केदार, दिनकर आढाव, मुकुंद आढाव, सौ कांचन खाडे, बाळासाहेब पालवे, दामोधर मानकर यांनी उमेदवारी मागितली.

नाशिक मध्य मतदारसंघात देवयानी फरांदे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात माजी आमदार वसंत गिते, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, सुरेश पाटील, नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, गणेश कांबळे, कुणाल वाघ, सुनील खोडे आणि आशिष नहार यांनी मुलाखती दिल्या.

हे सर्व पक्षात चांगला प्रभाव असलेले पदाधिकारी आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार फरांदे यांच्या मार्गात पक्षातील बड्या नेत्यांचा गतिरोधक आहे. शहरातील तिन्ही आमदारांपुढे चाळीस जणांनी मुलाखती दिल्या. यातील काहींनी प्रचारही सुरु केला आहे. त्यामुळे या मुलाखतींतच बंडाची धगधग दिसून आली आहे.

हे देखिल वाचा - 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com