अशोक चव्हाण म्हणतात, इंदापूरचा तोडगा निघू शकतो... पण हर्षवर्धन `नाॅट रिचेबल`

अशोक चव्हाण म्हणतात, इंदापूरचा तोडगा निघू शकतो... पण हर्षवर्धन `नाॅट रिचेबल`

पुणे : इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा दोन्ही काॅंग्रेसच्या वाटपात कोणाकडे ठेवायचा, याबाबत रोज नवीन घडामोडी समोर येत आहेत. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावर आज दिल्लीत स्पष्टीकरण दिले. या जागेबाबत तोडगा निघणे शक्य असून राष्ट्रवादी काॅंग्रेस त्यासाठी सकारात्मक असल्याचा दावा त्यांनी केला.

दिल्लीत एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले. तसेच हा तोडगा निघाल्याचे सांगण्यासाठी आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क करीत आहोत. मात्र त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. मी स्वतः त्यांच्याशी संपर्क केला. पण त्यांचा फोन नाॅट रिचेबल असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

याबाबत काॅंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. पवार साहेबांनीही त्यास अनुकूलता दर्शवली आहे. पवार साहेबांशी एकदा बोलून घ्या, असा निरोप हर्षवर्धन यांना द्यायचा आहे. आता मी मिडीयाच्या माध्यमातून त्यांना संपर्क करण्याचे आवाहन करतो, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

हर्षवर्धन यांनी कालच राष्ट्रवादीच्या विरोधात तोफ डागली होती. तसेच आपल्यासाठी जागा न सोडून राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याचा आरोप करत तालुक्यातील जनतेच्या कौलानुसार निर्णय घेऊ, असे जाहीर केले होते. काल झालेल्या मेळाव्यात गर्दीने त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर काॅंग्रेसने पावले टाकून राष्ट्रवादीचे मन वळविल्याचे दिसते आहे. आता हर्षवर्धन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com