RTO कडे 76 नवीन गाड्या तरी चेक पोस्टचे अधिकारी स्वतःच्याच वाहनात

जुन्या वाहनांनी किलोमीटर आणि कालावधीची मर्यादा ओलांडल्यानंतरही अधिकाऱ्यांनी त्याच वाहनांमध्ये कर्तव्य बजावले. ती वाहने वेगाने धावत नव्हती, जास्त वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला असता उलटण्याचीही भिती होती. पण कारवाईसाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करताना हा धोकासुद्धा वाहनचालक आणि अधिकाऱ्यांनी पत्करलेला आहे.
RTO New Vehicle
RTO New Vehicle

नागपूर : राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना नुकतीच नवीन वाहने मिळालेली आहेत. ३६ जिल्ह्यांसाठी ७६ गाड्या सरकारने परिवहन अधिकाऱ्यांच्या दिमतीला दिल्या आहेत. पण तरीही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांना चेक पोस्टसाठी (सीमा तपासणी नाका) अद्याप वाहने मिळालेली नसल्याची माहिती आहे. या अधिकाऱ्यांना स्वतःच्या वाहनांनी जाऊन सीमा तपासणी नाक्यांवर कर्तव्य बजावावे लागते. Seventy six new vehicle received but check post officers are in there own vehicles.

राज्यात २० ते २२ सीमा तपासणी नाके आहेत. हे नाके कार्यालयांच्या ठिकाणांपासून दूर अंतरावर आहेत. त्यामुळे येथे कर्तव्य बजावण्यासाठी अधिकाऱ्यांना विभागाने वाहने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. सध्या ज्या अत्याधुनिक गाड्या मिळाल्या, त्या केवळ वायुवेग पथकासाठी आहेत. चेक पोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःचीच वाहने वापरावी लागत आहे. चेक पोस्टवरील काम जोखमीचे असते. बाहेर राज्यांतून महाराष्ट्रात किंवा येथून परराज्यांत अवैधपणे जनावरांचीही वाहतूक केली जाते. अशा वेळी त्या गाड्यांचा पाठलाग करावा लागतो. त्यामुळे वेगवान आणि अत्याधुनिक गाड्यांची गरज येथेही आहे, असे अधिकारी सांगतात. 

नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही वाहने मुंबई येथे एका सोहळ्यात संबंधित जिल्ह्यांना देण्यात आली. ‘स्कॉर्पीओ ५५ एस ५’ हे वाहन परिवहन अधिकाऱ्यांच्या दिमतीला देण्यात आले आहेत. ह वाहन सुसज्ज असून यामध्ये स्पिड गन, जीपीआरएस, ड्रंक ॲण्ड ड्राईव्हीच्या कारवाईसाठी सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. पण या सुविधा वापरण्याचे प्रशिक्षण अद्याप संबंधितांना देण्यात आले नसल्याची माहिती आहे. लवकरच हे प्रशिक्षण पुणे येथे होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. तोपर्यंत ही वाहने प्रत्यक्ष उपयोगात येऊ शकणार नाहीत. 

वायुवेग पथक वापरणार अत्याधुनिक वाहने
नवीन वाहने खासकरून परिवहन कार्यालयांतील वायुवेग पथकांसाठी देण्यात आलेली आहेत. एका जिल्ह्यासाठी एकच वाहन असल्यामुळे प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतरही अडचणी येणार आहे. त्यामुळे अशी आणखी वाहने सरकारने उपलब्ध करून द्यायला पाहिजे, अशी मागणी अधिकाऱ्यांमधून लवकरच पुढे येण्याची दाट शक्यता आहे. 

मर्यादा ओलांडल्यावरही वापरली वाहने
परिवहन विभागाला दिलेले वाहन अडीच लाख किलोमीटर किंवा १० वर्षेच वापरले जावे, असा नियम आहे. पण यापूर्वी विभागाकडे असलेली वाहने ११ वर्ष झाले तरीही वापरात होती आणि बव्हंशी वाहनांनी किलोमीटरची मर्यादा दुप्पटीपेक्षा जास्त ओलांडली आहे. काही कार्यालयांतील वाहने ५ ते ६ लाख किलोमीटरपर्यंत चालवली गेली असल्याची माहिती ‘सरकारनामा’ला प्राप्त झाली. त्यावर अधिकाऱ्यांना बराच त्रागा केला होता, असेही सांगण्यात येते. 

जीव धोक्यात घालून बजावले कर्तव्य
जुन्या वाहनांनी किलोमीटर आणि कालावधीची मर्यादा ओलांडल्यानंतरही अधिकाऱ्यांनी त्याच वाहनांमध्ये कर्तव्य बजावले. ती वाहने वेगाने धावत नव्हती, जास्त वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला असता उलटण्याचीही भिती होती. पण कारवाईसाठी एखाद्या गाडीचा पाठलाग करताना हा धोकासुद्धा वाहनचालक आणि अधिकाऱ्यांनी पत्करलेला आहे. खटारा गाड्यांमध्ये जीव धोक्यात घालून अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com