बारचालकाकडून घेतली ४० हजारांची लाच, दोघे एसीबीच्या जाळ्यात...

दुय्यम निरीक्षक केवटसह खासगी व्यक्ती सांगोले यांनी ४० हजार रुपये तक्रारकर्त्या बारमालकाकडून घेताना एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. आज पहाटे पाच वाजेपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई चालली.
बारचालकाकडून घेतली ४० हजारांची लाच, दोघे एसीबीच्या जाळ्यात...
Bribe

अमरावती : शहरातील एका बार ॲंड रेस्टॉरेंट संचालकाला लाच मागण्यासाठी For taking the bribe राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साइज) निरीक्षकाने एका खासगी व्यक्तीला साथीला घेतले आणि त्याच्या माध्यमातून बार चालकाला धमकावून ४० हजारांची लाच घेतली. Bribe of forty thousand taken from from bar owner पण बार चालकाने एसीबीकडे तक्रार केल्याने निरीक्षक व त्याचा साथीदार अलगद जाळ्यात अडकले. दोघांनाही अटक करून शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. 

संजय उत्तमराव केवट (वय ४६) असे एक्साइजच्या दुय्यम निरीक्षकाचे नाव असून, त्यांच्यासह प्रशांत बाबूराव सांगोले (रा. देवीनगर, वडाळी) अशी ए.सी.बी.ने अटक केलेल्या दोघांची नावे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारकर्त्या व्यक्तीच्या वडिलांच्या नावाने बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटचा परवाना आहे. एक्साइजचे दुय्यम निरीक्षक केवट व खासगी व्यक्ती सांगोले यांनी बार मालकास भेटून त्यांना ५० हजार रुपयांची मागणी केली. 

पैसे न दिल्यास बारच्या स्टॉक रजिस्टरसह गोदामामध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई टाळण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी नमूद दोघांनी बालमालकाकडे १६ ऑगस्ट २०२० रोजी केली. तडजोडीअंती ४० हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झाले. बारमालकाने घटनेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती कार्यालयाकडे केली. त्यानुसार येथील ए.सी.बी.च्या पथकाने काल रेल्वेस्थानक ते अमरावती मध्यवर्ती बसस्थानक मार्गावर एका बँकेसमोर सापळा रचला. 

दुय्यम निरीक्षक केवटसह खासगी व्यक्ती सांगोले यांनी ४० हजार रुपये तक्रारकर्त्या बारमालकाकडून घेताना एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. आज पहाटे पाच वाजेपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई चालली. अटक केलेल्या दोघांना शहर कोतवाली ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. एसीबीचे अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संतोष इंगळे, सतीश उमेरे, सुनील वऱ्हाडे, युवराज राठोड, महेंद्र साखरे, अभय वाघ, तुषार देशमुख, नीलेश महिंगे, सतीश किटकूले, चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात यांनी ही कारवाई पार पाडली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने लाचखोरांविरूद्ध कारवाया केल्या जातात. त्यानंतर तरी लाचखोरांवर वचक बसायला हवा, अशी अपेक्षा आहे. पण सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील लाचखोर वृत्ती कमी होताना दिसत नाही. येनकेन प्रकारे खासगी लोकांना हाताशी धरून ही मंडळी आपले ईप्सित साध्य करीत असतात. लोकांनी निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणाऱ्यांच्या तक्रारी कराव्या, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. 
 Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.