नागपूरला मिळाले दोन नवे डिसीपी, ग्रामीणच्या अधीक्षकपदी आले विजय मगर...
Police Logo

नागपूरला मिळाले दोन नवे डिसीपी, ग्रामीणच्या अधीक्षकपदी आले विजय मगर...

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे पोलिस अधीक्षक पदी बदली झाली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त विजय मगर यांनी बदली नागपूर ग्रामीणमध्ये अधीक्षक पदावर झाली आहे.

नागपूर : राज्य शासनाने काल पोलिस अधीक्षक, उप आयुक्त पदावरील ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला बदल्यांची यादी जाहीर झाली. यामध्ये विदर्भातील १० अधिकाऱ्यांचा समावेश असून नागपुरातून ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलातील अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या बहुप्रतीक्षीत बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त विजय मगर यांनी बदली नागपूर ग्रामीणमध्ये अधीक्षक पदावर झाली आहे. 
 
नागपूर शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांची बदली दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक पदी बदली झाली आहे. तर डीसीपी निलोत्पल यांची पोलिस उपायुक्त मुंबई येथे बदली झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची बदली नागपुरातच राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त पदावर करण्यात आली आहे. नागपुरात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांची बदली नागपुरात राज्य राखीव दलाच्या गट क्र. १३ च्या समादेशक पदावर करण्यात आली आहे. 

नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या चेतना तिडके यांची शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पराग श्याम मणेरे यांची बदली नागपुरात उत्पादन शुल्क विभागात अपर पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. पूर्वी नागपुरात वाहतूक शाखेचे उपायुक्त असलेले चिन्मय पंडित यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त अधीक्षक मनिष कलवानीया यांची नागपूर पोलिस दलात उपायुक्त पदावर बदली झाली. 

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे पोलिस अधीक्षक पदी बदली झाली आहे.  राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त विजय मगर यांनी बदली नागपूर ग्रामीणमध्ये अधीक्षक पदावर झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदी बदली झाली आहे. राज्य गुप्तवार्ता नागपूर विभागाच्या उपायुक्त अनिता पाटील यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक येथे अधीक्षक पदावर बदली झाली आहे.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in