उद्घाटनानंतर लगेच बंद पडली प्रयोगशाळा, आता किट आल्यावरच होणार चाचण्या...

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा सुरळीत करण्यासाठी किट गरजेच्या असून पुण्यातून मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली.
उद्घाटनानंतर लगेच बंद पडली प्रयोगशाळा, आता किट आल्यावरच होणार चाचण्या...
Sarkarnama

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने Corona's First and secone wave हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटेत तर पटापट लोक मेले. सध्या कोरोनाचा प्रकोप नसला तरी डेंगीने डोके वर काढले आहे. पण प्रशासनाने कोरोनाच्या काळात जी बेपर्वाई केली, तीच सध्याही सुरू आहे. डेंगीच्या चाचण्या करण्यासाठीची प्रयोगशाळा उद्घाटनानंतर लगेच बंद पडली. त्यामुळे लोकांच्या रोगाचे निदान होत नाहीये. Laboratory closed immediately after the inauguration.

शहर व जिल्ह्यात डेंगीने थैमान घातले असताना व मृत्यू पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चाचणी करण्यासाठी कीटच उपलब्ध नसल्याने ही वेळ आली असून ही प्रयोगशाळा फार्स ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चाचणीसाठीचे नमुने यवतमाळ आणि अकोला येथे पाठवावे लागत आहेत. त्याचा अहवाल यायला विलंब होत असल्याने उपचार करण्यासाठीही अनेक अडचणी येत आहेत. 

गेल्या महिन्यात ३१ तारखेला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात डेंगीच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी ८८ चाचण्या झाल्या आणि चाचणीसाठी आवश्यक असलेल्या किट संपल्या. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा रक्तजल नमुने तपासणीसाठी अकोल्याच्या सेंटीनल सेंटरला पाठविण्यास सुरुवात झाली. शहर व जिल्ह्यात डेंगीचा प्रकोप वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांत बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आतापर्यंत २६७ रुग्ण बाधित असून अकरा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा शासकीय अहवाल आहे. 

डेंगीचा अहवाल मिळवण्यासाठी आधी यवतमाळ व नंतर अकोला येथे रक्तजल नमुने पाठविण्यात येत आहेत. त्याचा अहवाल मिळण्यास विलंब होतो. तोपर्यंत काही रुग्ण उपचार घेऊन दुरुस्त झाले आहेत. या रुग्णांना डेंगी झाला का, याचे निदान करण्यासाठी खासगी प्रयोगशाळेतील चाचणी अहवाल डॉक्टर्स ग्राह्य धरू लागले आहेत. शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये डेंगींच्या रुग्णांचीच गर्दी आहे. अमरावती विभागीय शहर असून अकोला व यवतमाळ येथे सुविधा आहेत, मात्र त्या अमरावतीत नाहीत. प्रयोगशाळा बंद पडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासारखे लोक पटापट मरायला लागल्यावर प्रयोगशाळा सुरू करणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. 

किट मागविल्या आहेत..
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा सुरळीत करण्यासाठी किट गरजेच्या असून पुण्यातून मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली. उद्या किंवा या आठवड्यात किट उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.