माजी मंत्री राठोड म्हणतात, ‘त्या’ शिक्षकाच्या पत्नीने नैराश्‍यातून खोटी तक्रार केली...

घाटंजी तालुक्यातील महिलेचे एक पत्र पोलिस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले. त्या पत्राची दखल घेत विशेष चौकशी पथक गठित करण्यात आले आहे. सदर प्रकरण संवेदनशील असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हाताळले जात आहे.
Sanjay Rathore
Sanjay Rathore

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील सेवानगर Sevanagar येथील एका महिलेने दोन दिवसांपूर्वी घाटंजी पोलिस व यवतमाळ येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात रजिस्टर्ड पोस्टाने एक लेखी तक्रार पाठविली आहे. त्यानंतर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ Chirta Wagh माजी मंत्री व विद्यमान आमदार राठोडांवर Former Minister and MLA Rathore पुन्हा तुटून पडल्या. यासंदर्भात आमदार राठोड म्हणाले, ‘त्या’ शिक्षकाच्या पत्नीने नैराश्‍यातून खोटी तक्रार केली असण्याची शक्यता आहे. Made false complaint. 

या आरोपासंदर्भात खुलासा करण्यासाठी आमदार राठोड काल शुक्रवारी स्वत: माध्यमांसमोर आले व त्यांची बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले की, हा प्रकार एका नेत्याची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी विरोधकांनी रचलेला कट आहे. घाटंजी तालुक्यातील शिरपूर येथील आश्रमशाळेतील एका शिक्षकाने राजीनामा दिला होता. नंतर नोकरीवर परत रुजू करून घेण्यासाठी त्याने शाळेचे मुख्याध्यापक व मला धमक्यांचे मेसेज केले. त्याबाबत वडगाव जंगल व अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या आहेत. हा वादच माझ्यावरील आताच्या खोट्या आरोपांचे मूळ आहे. सदर शिक्षकाच्या पत्नीनेच नैराश्यातून खोटी तक्रार केली असण्याची शक्यताही आमदार राठोड यांनी व्यक्त केली. 

शिवसेनेचे माजी मंत्री व दिग्रस-दारव्हा-नेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय राठोड यांनी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप करणाऱ्या पत्राची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तत्काळ विशेष चौकशी पथकाचे (एसआयटी) गठन केले आहे. घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने दोन दिवसांपूर्वी घाटंजी पोलिस व यवतमाळ येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात रजिस्टर्ड पोस्टाने एक लेखी तक्रार पाठविली आहे. त्यात आमदार राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विट केल्याने व सदर महिलेने ही तक्रार ट्विटरवरून सार्वजनिक केल्याने आमदार संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी चालविल्या. 

या आरोपांच्या चौकशीसाठी गठित केलेल्या एसआयटीचे प्रमुख म्हणून अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात अवधूतवाडीचे पोलिस निरीक्षक मनोज केदारे, घाटंजीचे ठाणेदार बबन कराळे, प्रभारी सायबर सेलप्रमुख, प्रभारी महिला सेल, भरोसा सेल येथील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकातील अधिकाऱ्‍यांनी काल घाटंजी गाठून तक्रारकर्त्या महिलेची भेट घेतली व तिचे बयाण नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांची प्रकृती व माझी मनःस्थिती बरोबर नाही, असे निवेदन तिने पोलिसांना दिले. त्या महिलेचे माहेर असलेल्या लाडखेड पोलिस ठाण्यासह यवतमाळ येथे राहत असलेल्या भावाकडे जाऊनही पोलिस तपास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

घाटंजी तालुक्यातील महिलेचे एक पत्र पोलिस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले. त्या पत्राची दखल घेत विशेष चौकशी पथक गठित करण्यात आले आहे. सदर प्रकरण संवेदनशील असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हाताळले जात आहे. 
- डॉ. दिलीप पाटील भुजबळ, पोलिस अधीक्षक, यवतमाळ. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com