'फुकट बिर्याणी'वरुन कृष्णप्रकाश यांनी दिला घरचा आहेर

आहार भत्ता दिला जातो. त्यामुळे अशा गोष्टी डिमांड करण्याची गरज नाही
4Sarkarnama_20Banner_20_202021_08_12T155003.005.jpg
4Sarkarnama_20Banner_20_202021_08_12T155003.005.jpg

पिंपरी : पोलिसांनी मागणी म्हणजे डिमांड करणं (एकप्रकारे लाचच) चुकीचं आहे, असा घरचा आहेर पिंपरी-चिंचवडचे  Pimpri-Chinchwad दबंग पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश Krishnaprakash यांनी पुणे येथील महिला आयपीएस पोलिस उपायुक्ताच्या बिर्याणी प्रकरणावर दिला.  पोलिसांना बिर्याणीसाठी पैसे द्यावे लागत नाही, असं काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं. 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

आपल्या हद्दीतच बिर्याणीसाठी कुठं पैसे द्यायचं का अशी विचारणा आपल्या पोलिसाला करीत त्याबाबत स्थानिक वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला सांगू का असं बोलणाऱ्या या महिला अधिकाऱ्याचा ऑडिओ नुकताच व्हायरल झाल्याने तो मोठा चर्चेचा विषय झाला. त्याबाबत प्रामाणिक, तडफदार व कार्यक्षम अशी प्रतिमा असलेले कृष्णप्रकाश म्हणाले, ''रिसपेक्ट हा डिमांड करावा लागत नाही, तर तो कमांड करावा लागतो. तुम्ही लोकांची सेवा करत असाल, भुकेलेले असाल, तर तुम्हाला लोकं स्वत:हून जेवायला आणून देतील. कोरोना काळात पोलिस रस्त्यावर होतो, तेव्हा आणून दिले होतेच की. पण, डिमांड म्हणजे मागणे चुकीचे आहे. कारण तुम्हाला त्यासाठी पगार मिळतो. आहार भत्ता दिला जातो. त्यामुळे अशा गोष्टी डिमांड करण्याची गरज नाही. हे चुकीचं आहे, हे सांगायलाही लागू नये.
अनिल देसाई कुणाचे गळे दाबायला गेले नव्हते! 
कोरोना काळात कृष्णप्रकाश यांनी वेषांतर करून आपल्या काही पोलिस ठाण्यांची पाहणी केली होती. त्यांच्या या कृतीची जोरात चर्चा झाली.त्याचे कौतूक झाले, तसे काहींना हा प्रकार नाटकी वाटला होता. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला आयुक्तांनी काहीसे सावध, पण पुन्हा आपल्या बिनधास्त शाहीरी अंदाजात ''लोग क्या कहेंगे, ये मैं सोचूंगा, तो लोक क्या सोचेंगे,'' असे उत्तर दिले. ते म्हणाले, पण, अशा कृतीतून पोलिस अधिकारी व कर्मचारी चुकीच्या गोष्टी करण्यापासून परावृत्त होतात. कारण त्यांना धाक वाटत राहतो की आपले साहेब इथेही वेषांतर करून येऊ शकतात. कोरोना काळात माझ्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. काही ठिकाणी टवाळखोरांकडून मुलींची छेड काढली होती. रुग्णवाहिकाचालकांकडून अवाच्या सव्वा पैसे उकळले जात होते. अशा परिस्थितीत गांजलेल्यांना पोलिस ठाण्यातून कसा प्रतिसाद मिळतो, त्यांच्या तक्रारी घेऊन त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जातो का याची पडताळणी करण्यासाठी हा वेषांतर दौरा केला होता.

एखादी गोष्ट शंभरवेळा ऐकण्यापेक्षा एकदा, तरी ती पहा हे जपानी तत्वज्ञान मला आवडते. म्हणून ते आचरणात आणतो. . बुलढाण्याला एसपी असतानाही पूर्वी असा प्रयोग केला होता. त्याचा धाक बसून अवैध वाहतुकीला शिस्त लागली होती. काळ्या-पिवळ्या टॅक्सीत परवानगी असलेल्या नऊ प्रवाशांपेक्षा अधिकजणांना बसवून घेण्यास चालक मनाई करू लागले होते. त्याचा फटका एका उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींनाही बसला होता. ते आपले कुटुंब व नातेवाईक अशा दहाजणांसह एका कार्यक्रमाला देऊळगावराजा येथे आले होते. तेथून परतताना त्यांनी ही काळी -पिवळी टॅक्सी केली. मात्र, नऊपेक्षा अधिकजणांना म्हणजे खाली राहिलेल्या त्यांच्या पत्नीलाच बसवून घेण्यास चालकाने नकार दिला.  त्यावर संध्याकाळी आता दुसरी गाडी कुठे मिळणार, एक जास्त असला, तर कुठे काय होते असे हे न्यायमुर्ती म्हणाले. त्यावर आमचा एसपी खूप डेंजर आहे,असे हा चालक म्हणाला. त्यावर ते आता इथे येतील का, अशी विचारणा त्यांनी केली असता, ते इथेही वेषांतर करून बसले असतील, त्यांचा काय भरवसा नाही, असे हा चालक म्हणाला होता.
  Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com