जप्तीच्या नोटीसमुळे राष्ट्रवादीचे नेते जानकर अडचणीत ; नऊ कोटींचे कर्ज थकविले

जानकरांना जप्तीची नोटीस दिल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-14T100839.749.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-14T100839.749.jpg

पंढरपूर :  माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे समर्थक उत्तम जानकर  Uttam Jankar यांची वेळापूर, उघडेवाडी व सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील स्थावर मालमत्ता जप्त करण्याची नोटीस पंढरपूर  बँकेने दिली आहे. जानकर यांच्यासह इतर दोघांकडे 9 कोटी 30 लाख 26 हजार  933 रुपये कर्ज थकले आहे. जानकरांना जप्तीची नोटीस दिल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


कर्ज वसुलीसाठी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाप्रमाणे हुकूमनामा आदेश अवार्ड मिळवला आहे. त्यानुसार बँकेचे विशेष वसुली अधिकारी राहुल जाधव यांनी मालमत्ता जप्तीची नोटीस जाणकर यांच्यासह दत्ता ज्ञानेश्वर मदने व प्रदीप शंकर दडस  या कर्जदारांना दिली आहे.

जानकर यांनी 2019 मध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघातून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी जानकर हे भाजपमध्ये होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळेच अर्बन बँकेचे अध्यक्ष असलेले भाजप आमदार प्रशांत परिचारक‌ यांनी जानकरांना कर्ज दिले होते. जप्तीच्या नोटीसमुळे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नाहीतर ईडी लावणार ; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकी 
मुंबई :  राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने निनावी फोनचे प्रकरण समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे Uddhav Thackeray स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांना व्हाँट्सअँपवर धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नार्वेकर या़ंनी ही बाब मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. नगराळे यांनी हे प्रकरण तपासासाठी मुंबईच्या गुन्हे शाखकडे सोपवलं आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com