नाहीतर ईडी लावणार ; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकी

उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर हे त्यांच्या सावली सारखे मागे असतात. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे.
2milind_narvekar.jpg
2milind_narvekar.jpg

मुंबई :  राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने निनावी फोनचे प्रकरण समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे Uddhav Thackeray स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांना व्हाँट्सअँपवर धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नार्वेकर या़ंनी ही बाब मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. नगराळे यांनी हे प्रकरण तपासासाठी मुंबईच्या गुन्हे शाखकडे सोपवलं आहे.

मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे.

मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आहे. ठाकरे कुटुंबियांच्या ते एकदम जवळची व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. विशेषता उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर हे त्यांच्या सावली सारखे मागे असतात. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीने नार्वेकरांना मेसेज करून काही मागणी केली ही मागणी पूर्ण न केल्यास त्या व्यक्तीने नार्वेकर यांना सीबीआय ईडी किंवा इतर केंद्रीय तपास  यंत्रणाद्वारे अडचणीत आणण्याची धमकी दिली. हा मेसेज पाहताच नार्वेकर यांनी हेमंत नगराळे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देत लेखी तक्रारही दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबधित नंबरची माहिती कंपनीकडे मागितली आहे. आरोपीने ज्या नंबरहून ही धमकी दिली आहे. त्यावेळी त्यांनी एका अॅप्लिकेशनचा वापर केला असावा. ज्यानेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com