Sarkarnama
Sarkarnama

‘त्या’ दोघांना तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही… 

यवतमाळ शहरातील संगठीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दोघांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात यावी. भुमाफियांना लगाम लावण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली.

यवतमाळ : माजी आमदार विजया धोटे Former MLA Vijay Dhote यांच्या घरावर हल्ला करून गेल्या ४० वर्षांपासून विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे Jambuwantrao Dhote यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी सुमित बाजोरीया व बंटी जयस्वाल Sumit Bajoriya and Bunty Jaiswal यांनी गुंडासह येऊन धुडगूस घातल्याचा आरोप ज्वाला धोटे Jwala Dhote यांनी आज पत्रकार परिषदेत केला. गुंड प्रवृत्तीच्या या लोकांना तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ज्वाला यावेळी म्हणाल्या. 

बुधवारी सुमित बाजोरीया व बंटी जयस्वाल दोघेही पाच वाहनांतून धोटे यांच्या घरी आले. माजी आमदार धोटे यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. घरातील काच फोडून राडा केला. जेसीबीद्वारे भिंत फोडली. माजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले, असा आरोप ज्वाला धोटे यांनी केला. आमदार, तहसीलदारांना फोन करून त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे माजी आमदार धोटे यांनी सांगितले. 

घरात कुणीही नसताना हा प्रकार घडला. आईने माहिती दिल्यावर नागपूरहून यवतमाळला यावे लागले. दोघांनाही तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला. सदर भूखंड बक्षीसपत्राद्वारे मिळाला होता. त्याचे कागदपत्रेही आहेत. या संदर्भात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचेही धोटे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार विजया धोटे, लालजी राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यवतमाळ शहरातील संगठीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दोघांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात यावी. भुमाफियांना लगाम लावण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com