महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या ‘त्या’ दोन नेत्यांमधील वैर संपेल का?

मागील महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा राडा झाला होता. काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्याची मोठी किंमत निवडणुकीत काँग्रेसला चुकवावी लागली होती.
Vikas Thakre - Nitin Raut
Vikas Thakre - Nitin Raut

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या Nagpur Municiia; Corporation मागील निवडणुकीत कॉंग्रेस नेते आपसातच भिडले होते. त्यावेळी मोठा तमाशा झाला होता. तिकीट वाटपात अन्याय झाल्याचा आरोप करून एका गटाने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या अंगावर शाई फेकली होती आणि अंडेही मारले होते. कॉंग्रेस नेत्यांचे ते वैर आजही कायम आहे. त्यामुळे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे MLA Vikas Thakre आणि पालकमंत्री नितीन राऊत Guardian Minister Nitin Raut यांच्यातील वैर आगामी निवडणुकीत संपेल की पुन्हा तोच कित्ता गिरवला जाईल, याबद्दल राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहे. 

मागील महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा राडा झाला होता. काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्याची मोठी किंमत निवडणुकीत काँग्रेसला चुकवावी लागली होती. तेव्हा असंतुष्ट कार्यकर्त्यांचे नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आता राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. मात्र शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत सक्रिय असून अद्यापही त्यांच्यातील वैर कायम आहे. त्यामुळे निष्ठावान काळजीत पडलेले दिसतात. 

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश देताच शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी तातडीने १८ ब्लॉकवर समन्वयकांची नियुक्ती केली. समन्वयकाने प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांच्या संपर्कात राहून त्यांच्या कार्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले आहे. 

आगामी महापालिकेची निवडणूक एक सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग रचनेचे स्पष्ट आदेश काढले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. सध्याची पोषक परिस्थिती बघता काँग्रेसला महापालिकेत मोठी मुसंडी मारण्याची आशा आहे. त्याकरिता तयारी सुरू केली आहे. त्यानुसार यंत्रणा सज्ज केली जात आहे. समन्वयकांमध्ये पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघ- संदेश सिंगलकर, प्रकाश राव, रामभाऊ कळंबे, पूर्व विधानसभा- मनीष उमरेडकर, मनोज नोकरकर, पुरुषोत्तम लोणारे, दक्षिण विधानसभा- डॉ.सुधीर आघाव, सुनील पाटील, किशोर गीद, मध्य नागपूर- प्रभाकर खापरे, राजेश कुंभलकर, आशिष दीक्षित, दक्षिण-पश्चिम- अजय नासरे, मनीष चांदेकर, प्रसन्ना जिचकार, उत्तर विधानसभा- बॉबी दहिवले, विवेक निकोसे, मिलिंद सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com