केदारांच्या बरखास्तीची मागणी करणाऱ्या देशमुखांना पटोलेंनी दिली बढती...

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजीत देशमुख सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू आहे.
Sunil Kedar - Patole - Deshmukh
Sunil Kedar - Patole - Deshmukh

नागपूर : गेल्या आठवड्यातील शनिवार राज्याच्या राजकारणात एक नवीन वादळ घेऊन आला. या दिवशी काटोल येथे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Animal and Husbandery Minister Sunil Kedar यांनी माजी आमदार आशिष देशमुख Former MLA Ashish Deshmukh यांना आढावा सभेत मंचावरील खुर्चीवरून अपमानास्पदरित्या उठवून दिले. त्या अपमानाचा बदला म्हणून मग देशमुखांनी केदारांच्या बरखास्तीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress Nana Patole यांनी आशिष देशमुख यांना महासचिव करून बढती दिली. 

प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले केदार आणि देशमुख वादात काही बोलले नाहीत. पण आशिष देशमुखांना बढती दिल्यामुळे त्यांनी न बोलता त्यांच्या पारड्यात वजन वाढवण्याचा तर प्रयत्न केला नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. देशमुखांनी तक्रार केल्यानंतर मंत्री केदार यांनी तात्काळ दिल्ली गाठली आणि आपली बाजू सांभाळून घेतली. त्यानंतर मागोमाग आशिष देशमुखही दिल्लीत गेले आणि त्यांची बाजू श्रेष्ठींसमोर मांडली, अशी माहिती आहे. त्यानंतर काल रात्री जाहीर झालेल्या कॉंग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत देशमुख यांना प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव पद देण्यात आले. 

केदार आणि देशमुख यांच्यातील वैर तसे जुनेच आहे आणि त्यात केदारांनी काटोल आणि नरखेडमध्ये आढावा बैठक आयोजित केली. ही बाब देशमुख यांना खटकली. येवढेच नव्हे तर केदारांनी रात्री उशिरापर्यंत काटोल तालुक्याचा दौरा केला. त्यामुळे देशमुख चांगलेच काळजीत पडले होते. मागील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांना आपले लक्ष पुन्हा काटोल मतदारसंघाकडे केंद्रित केले. २०१४ मध्ये ते याच मतदारसंघातून त्यांचे काका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करून आमदार झाले होते. काटोलमध्ये केदारांनी काम सुरू केल्यामुळे देशमुखांचा तिळपापड झाला होता. 

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजीत देशमुख सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध सुरू आहे. सुरुवातीला सावनेरमधून देशमुखांनी केदारांना एकदा पराभूत केले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत केदारांनी पराभवाचे उट्टे काढले. आशिष देशमुख भाजपचे उमेदवार असताना सावनेरमध्ये त्यांची केदार यांच्याशी जोरदार लढत झाली होती. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्ते आपसात भिडले होते. त्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून त्यांच्यात विस्तवही जात नाही. या दोन्ही नेत्यांचा वाद ताजा असताना प्रदेशाध्यक्षांनी देशमुखांना महासचिव बनवून केदारांच्या विरोधात बळ देण्याचा तर प्रयत्न केला नाही ना, या दिशेने राजकीय जाणकार विचार करताना दिसताहेत. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com