शिवसेनेवर भुंकण्यासाठीच राणेंना मंत्रिपद दिलंय, घरात घुसून राणेंचा माज उतरवू…

नुकतेच केंद्रीय मंत्री झालेल्या झालेल्या नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानावर बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले आहेत. राणेंचा सत्तेचा माज त्यांच्या घरात जाऊन उतरवू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Sanjay Gaikwad - Narayan Rane
Sanjay Gaikwad - Narayan Rane

बुलडाणा :  केंद्रीय मंत्री नारायण राणे Union Minister Narayan Rane यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad म्हणाले, की नारायण राणे यांचा हा बेतालपणा नसून सत्तेचा माज आहे. केवळ शिवसेनेवर भुंकण्यासाठी त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. त्यांच्या घरात घुसून त्यांचा माज उतरवू.

नुकतेच केंद्रीय मंत्री झालेल्या झालेल्या नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानावर बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले आहेत. राणेंचा सत्तेचा माज त्यांच्या घरात जाऊन उतरवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. यापुढे ते असे बोलल्यास त्यांचा हिशोब चुकता करण्यात येईल. पोलिसांनी कारवाई न केल्यास कोकणात जाऊन त्यांच्या घरात घुसून हिशोब केला जाईल, असा संतप्त इशारा आमदार गायकवाड यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भारी पडत असल्याचे दिसत आहे. शिवसैनिकांनी राज्यभर राणेंच्या विरोधात मोर्चे, आंदोलने सकाळपासूनच सुरू केली आहे. त्यामध्येही कुठे बऱ्याच ठिकाणी चांगलाच गोंधळ उडत आहे. बुलडाणा जिल्ह्यातही शिवसेनेकडून राणेंचा निषेध केला जात आहे.

‘माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही. कोण सुधाकर बडगुजर? त्यांना मी ओळखत नाही. काही माध्यमांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. माझी बदनामी करणाऱ्या माध्यमांवर मी गुन्हा दाखल करेल’, असा इशारा त्यांनी दिला.  राणेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बोलत होते. 

राणे म्हणाले की, मी कुठल्याही माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मुख्यमंत्र्यांना देशाचा अमृतमहोत्सव माहीत नाही, त्याला मी काय करू. मी शिवसेनेला घाबरत नाही. नाशिकच्या पोलिसांनी आदेश काढला आहे. नाशिक पोलिस अधीक्षक आदेश काढतात ते काय राष्ट्रपती आहेत काय? या देशात घटनेचे राज्य आहे. न्यायालय सगळ्यासाठी उपलब्ध आहे.  ते आमच्यासाठीही आहे.  

मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी राणे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांमध्ये काल रात्री झाली चर्चा करण्यात आली. राणेंनी केलेली वक्तव्यावर आता भूमिका घेतली नाही तर जनतेत संदेश वाईट जाईल, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीका केली आहे.मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. यावरून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद पेटला आहे. राणे यांच्यावर शिवसेनेकडून राज्यभर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेना पुढे आली आहे. आत्तापर्यंत राणेवर तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहे. राणेंना अटक होईल का, हे लवकरच समजेल.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com