शेतकरी म्हणतात, चुकारे देता का चुकारे, नेत्यांची जाहिरातबाजी ठरली फोल...

खुद नेत्यांकडून आश्वसान मिळाले म्हटल्यावर जिल्ह्यातील शेतकरी आस लावून बसले होते. मात्र आज त्यांची सपशेल निराशा झाली असून नेमक्या विश्वास ठेवावा तरी कुण्यावर हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
Nana Patole - Patel - Fuke
Nana Patole - Patel - Fuke

भंडारा ः भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील नेत्यांनी Leaders of Bhandara and Gondia Districts मोठी जाहिरातबाजी करुन सोमवारी (आज) थानाचे थकित चुकारे आणि बोनसची रक्कम मिळेल, अशी घोषणा केल्या होत्या. पण आजचा दिवस उलटून गेला तरीही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एक छदामही जमा झालेला नाही. Money is not deposited in the account of farmers. 

वरिष्ठ नेत्यांनी घोषणा केल्यावर आज धानाचे थकित चुकारे व बोनसची रक्कम मिळेल ह्या आशेवर बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चक्क निराशा झाली. आज सोमवार उलटला तरी बैकेत साधा एक पैसासुद्धा न आल्याने भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांची जाहिरातबाजी  केवळ प्रसिद्धीचा स्टंट होता, असे बोलले जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे  सोमवारी खात्यात पैसे मिळणार असल्याची जाहिरातबाजी जिल्ह्यातील सत्ता पक्षाचे ज्येष्ठ नेते काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांनी केली होती. यात भर की काय आपल्या आंदोलनाचे सार्थक झाल्याचा आव विरोधी पक्षात असलेले परिणय फुके यांनी आणला होता. मात्र हे सर्व दावे आज फोल ठरले आहे. त्यांमुळे जिल्ह्यातील धान उत्पादन शेतकऱ्यांची थट्टा असल्याची ओरड सुरु झाली आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया हे जिल्हे राज्यात धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. धान हे प्रमुख पिक असल्याने शासनाकड़ून खरीप व रब्बी हंगामातील धानाची आधारभूत खरेदी केन्द्रांमार्फत खरेदी केली जाते. जिल्ह्यात 22 जूनपासून रब्बी हंगामातील धान खरेदीस सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 55 हजार 500 शेतकऱ्यांकडून तब्बल 22 लाख 45 हजार क्विंंटल धान शासनाने खरेदी केलाय. ह्या खरेदी धानाची किंमत 419 कोटी रुपये आहेत. मात्र यापैकी शासनाने केवळ 96 कोटी रूपयांचे चुकारे दिले असून 323 कोटी रूपयांचे चुकारे बाकी आहे. 

भंडारा जिल्हात देखील 43 हजार 835 शेतकऱ्यांकडून 18 लाख 39 हजार 722 क्विटल धानाची खरेदी केली असून यांची किंमत 343 कोटी 66लाख 1 हजार 461 रुपये आहेत. यात केवल 85 कोटी 48 लाख 97 हजार 410 रूपयांचे चुकारे देण्यात आले असून अद्याप 258 कोटी 17 लाख 4 हजार 51 रुपयांचे चुकारे अद्याप बाकि आहे. 2 महिन्यांचा कालावधि होऊनसुद्धा चुकारे न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या खरीप हंगमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांने आर्थिक गणित कोलमडले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  हातउसने करून रोवनी केली. खरी मात्र आता खते-किटकनाशके फवारणी यासाठी पैसेच नसल्याने शेतकरी चितेत पडला आहे.

डोक्यावर हात ठेवून शासनाच्या मदतीकड़े नजरा लावून बसला आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून  जिल्ह्यातील सत्ता पक्षाचे मोठ्या  नेत्यांच्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा सोमवारी धानाचे थकित चुकारे व बोनस मिळणाऱ अशा आशयाचे मेसेजेस व्यहारल करत होते. आता खुद नेत्यांकडून आश्वसान मिळाले म्हटल्यावर जिल्ह्यातील शेतकरी आस लावून बसले होते. मात्र आज त्यांची सपशेल निराशा झाली असून नेमक्या विश्वास ठेवावा तरी कुण्यावर हाच प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ह्या नेत्यांचे कार्यकर्ते तोंडघशी पड़ले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर चुकारे देता का चुकारे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एकंदरित शासनाकड़े धान खरेदीचे वेळापत्रक दरवर्षी सारखे असते. असे असले तरी केवळ नियोजनशून्य कारभारामुळे धानाच्या चुकाऱ्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने दरवर्षी जिल्हातील शेतकऱ्यांचे हँगामाचे वेळापत्रक चूकते आहे, त्याच्या परिणाम कमी उत्पादन पर्यायाने कर्जाबाजारीपणात होत असतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com