नारायण राणेंची भावना मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची नाही…

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जनतेला न्याय मिळत नाहीये. सरकार त्यामध्ये सातत्याने अपयशी ठरते आहे. अशा मुख्यमंत्र्याचा सत्तेवर राहून उपयोग काय, असे नारायण राणेंना वाटते.
नारायण राणेंची भावना मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची नाही…
Uddhav Thackeray - Athavale - Rane

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. Union Minister Narayan Rane is the Leader of Maharashtra राज्याचा विकास व्हावा, ही त्यांचीही मनोमन इच्छा आहे. पण राज्य सरकार विकासाकडे लक्ष देत नाहीये. पूरस्थिती असो की कोरोना, दोहोंकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ॲक्टीव्ह राहावे, अशीच मंशा नारायण राणे यांची आहे. मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची भावना राणेंची नाही, असे म्हणत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले Ramdas Athavale यांनी आज हा वाद सौम्य करण्याचा प्रयत्न केला.  

आज नागपुरात आले असताना आठवलेंनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, नारायण राणे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री बनवले. त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने लोकांना मदत करणे गरजेचे होते. पावसाळ्यात दरडी कोसळून ज्या लोकांचे नुकसान झाले, त्यांनाही मदत करणे अपेक्षित होते. पण या कामात राज्य सरकार अपयशी ठरले. राणेंना अटक करण्यासंदर्भात कायदेशीर काय कारवाई सुरू आहे, ती होईलही. शेवटी कायद्याच्या समोर कुणीही मोठा नाही. पण तरीही त्यांना अटक होईल, असे वाटत नाही. नंतर राणे आपली भूमिका स्पष्ट करतील. 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जनतेला न्याय मिळत नाहीये. सरकार त्यामध्ये सातत्याने अपयशी ठरते आहे. अशा मुख्यमंत्र्याचा सत्तेवर राहून उपयोग काय, असे नारायण राणेंना वाटते. त्यामुळे अपयशी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत राणेंनी ते वक्तव्य केले. एकनाथ शिंदे भाजपमध्ये येतील, अशी भूमिका राणेंनी मांडली होती. शिवसेनेत अनेक आमदार नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेने आजपर्यंत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सामना केलेला आहे. बाळासाहेब ठाकरे असताना सामना या वृत्तपत्रातून ते शिवसेनेची भूमिका वेळोवेळी मांडत होते. पण यांनी आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सलगी केल्याने शिवसेनेत मंत्री, आमदारांसह अनेक जण नाराज आहेत आणि भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे आठवले म्हणाले. 

शिवसेनेची भाजपसोबत गेल्या ३० पेक्षा जास्त वर्षांपासून युती होती. आताही शिवसेनेतील अनेकांना वाटते की, महाविकास आघाडी तुटावी आणि शिवसेनेने भाजपसोबत यावे. त्यामुळेच राणेंनी एकनाथ शिंदेंबाबत तसे वक्तव्य केले असावे. शिवसेना जर पुन्हा भाजपसोबत आली तर नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंचा वाद निश्‍चितपणे मिटू शकतो, असेही रामदास आठवले म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in