भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट केली पीएच्या नावे, सोमय्यांचा आरोप...

भावना गवळींच्या कामांत सईद खान नामक व्यक्ती गुंतलेला असल्याचीही माहिती आहे. तो गवळींचा भागीदार असावा, अशीही शंका अनेकांना आहे. ईडीच्या पथकाने खानच्या घराचीही झडती घेतल्याची माहिती आहे.
Kirit Sommya - Bhawna Gawali
Kirit Sommya - Bhawna Gawali

नागपूर : भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी यवतमाळ-वाशीमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळींची Yavatmal - Washim's MP Bhawana Gawali ईडीकडे तक्रार केल्यानंतर गवळींच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. सोमय्या त्यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. गवळींनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट ही महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये परिवर्तित करताना मोठा गैरप्रकार केल्याची तक्रार मिळाली असल्याचे सोमय्या BJP's MP Kirit Somayya यांनी आता म्हटले आहे. 

खासदार सोमय्या म्हणाले या गैरप्रकाराची तक्रार त्यांना प्राप्त झाली आहे. या प्रकरणात खासदार गवळींना गैरप्रकार केला आहे. या ट्रस्टच्या मालकीची ७० कोटींची संपत्ती खासदार गवळींनी त्यांच्या पीएच्या नावावर केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या सर्व गैरप्रकाराचा तपास व्हायला हवा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. या घडामोडींमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कालच त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात निवेदन दिले आणि आज सोमय्यांनी हा आरोप केला. 

खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातले आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भावना गवळी लवकरच तुरुंगात जातील, असा दावा सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. तो खरा ठरताना दिसतो आहे. 

रिसोडनजीकच्या देगाव येथे खासदार गवळी यांचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना आणि भावना पब्लिक स्कूल व डीएमएलटी कॉलेज आहे. तर शिरपूरला वरिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्वच ठिकाणी ईडीने छापे घातले. बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये निश्‍चितच काहीतरी गौडबंगाल आहे. पण शाळा आणि महाविद्यालयांत तसे काहीही नसल्याचे शिवसैनिक सांगत आहे. केंद्रातील भाजप सरकार ईडीचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही शिवसैनिक करीत आहेत. असे असले तरी ईडी कसून चौकशी करीत आहे.

सोमय्यांनी वाशीम गाठून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी खासदार गवळींच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला होता, त्यांच्यावर शाईसुद्धा फेकली होती. त्याचवेळी सोमय्यांनी गवळींना आव्हान दिले होते आणि ईडी, आरबीआयकडे तक्रार केली होती. सोमय्या यांनी गवळी यांच्यावर बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. भावना गवळींचा १०० कोटींचा घोटाळा. १८ कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात ७ कोटी रोख ठेवणे, बॅंकांना फसविणे आदी आरोप लावण्यात आले आहेत. 

गवळींच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्याने चौकशी थांबेल, असे त्यांना वाटले असावे. पण आता त्यांचा हा भ्रम तुटला आहे. घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे पाप राज्य सरकारने केले असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. आता या नवीन प्रकरणाचीही चौकशी होणार असल्याचे आज सोमय्यांनी सांगितले. 

भावना गवळींच्या कामांत सईद खान नामक व्यक्ती गुंतलेला असल्याचीही माहिती आहे. तो गवळींचा भागीदार असावा, अशीही शंका अनेकांना आहे. ईडीच्या पथकाने खानच्या घराचीही झडती घेतल्याची माहिती आहे. काल सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. पण त्यानंतर नेमकी कारवाई काय केली, हे कळू शकले नाही. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com