देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भडका..'यही है अच्छे दिन'? - yuva sena slams bjp government over rising pertol diesel and lpg prices | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भडका..'यही है अच्छे दिन'?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

देशभरातील जनता इंधन दरवाढीने त्रस्त झाली आहे. यावरुन युवा सेनेने केंद्रातील भाजप सरकारला सवाल केला आहे. 

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येऊ लागले आहे.  पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरुन युवा सेनेने आता केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. 

अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. त्यानंतर रविवारी (ता.21) आणि सोमवारी (ता.22) इंधन दरात वाढ झालेली नाही. इंधन दरवाढीवरुन भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधक लक्ष्य करीत आहेत. यातून दिलासा देणारे कोणतेही पाऊल अद्याप केंद्र सरकारने उचललेले नाही. 

यावर आता युवा सेना आक्रमक झाली आहे. युवा सेनेने मुंबईतील पेट्रोल पंपांवर बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा 2015 मधील दर आणि आताचा दर देण्यात आला आहे. दोन्ही दरांची तुलना करुन हेच का अच्छे दिन, असा सवालही करण्यात आला आहे. 2015 मध्ये एलपीजी सिलिंडर 572 रुपये, डिझेल प्रतिलिटर 52.99 रुपये आणि पेट्रोल प्रतिलिटर 64.60 रुपये होते. 2012 मध्ये एलपीजी सिलिंडर 719 रुपये, डिझेल प्रतिलिटर 88.06 रुपये आणि पेट्रोल प्रतिलिटर 96.62 रुपये आहे. 

हेही वाचा : निर्मला सीतारामन म्हणतात, हे तर महाभयंकर धर्मसंकट...

तेल कंपन्याच खनिज तेलाची आयात करतात. त्याच त्याचे शुद्धिकरण करुन वितरीत करतात आणि त्याच त्याची किंमत ठरवतात. तेल उत्पादक देशांनी आगामी काळात तेल उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पुढील काळात पेट्रोलच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यता आहे.  

हेही वाचा : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणतात, आमच्या हातात काही नाही

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९0 रुपये एवढा कर आकारत आहे. महाराष्ट्र सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. सलग बारा दिवस इंधन दरांत वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपयांवर पोचले होते. तसेच, डिझेल ८८.६ रुपये प्रतिलिटरवर पोचले होते. आज दरात कोणताही बदल झाली नाही. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख