विलासकाकांकडुन गुळाची ढेप मिळालीच नाही : शंभुराज देसाई 

विलासकाकांनी बुके देण्याचे टाळुन गुळाची ढेप, शाल, श्रीफळ देवुन त्यांच्या सत्कार करण्याची पध्दत रुढ केली होती. त्याची राज्यातील मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार चर्चा करत असत.
विलासकाकांकडुन गुळाची ढेप मिळालीच नाही : शंभुराज देसाई 
No jaggery from Vilaskaka: Shambhuraj Desai

कऱ्हाड : माजी मंत्री विलासकाका पाटील यांच्याकडे राज्यातील, केंद्रातील कोणीही मंत्री, खासदार, आमदार आले की ते त्यांना गुळाची ढेप, शाल, श्रीफळ देवुन त्यांचा यथोचीत सत्कार करत असत. मात्र, मला विलासकाकांकडून गुळाची ढेप कधीच मिळाली नाही, असे सांगुन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी काकांच्या गुळाच्या ढेपेची आज आठवण करून दिली. त्यांच्या या ढेपेची विधानभवनात, मंत्रालायतही चर्चा व्हायची, असे त्यांनी नमुद केले. No jaggery from Vilaskaka: Shambhuraj Desai

माजी मंत्री (कै) विलासकाका उंडाळकर हे कऱ्हाड दक्षिणचे सलग ३५ वर्षे आमदार होते. त्यांच्या काळात त्यांनी सहकारी संस्थांना पाठबळ देवुन त्या संस्था नावारुपास आणल्या. अनेक वर्षे ते कऱ्हाडच्या शेती उत्पन्न बाजार समिती, कऱ्हाड तालुका खरेदी विक्री संघ, कोयना दुध संघ, कोयना बॅंक यांच्या साधिन्यात होते. कऱ्हाडच्या बाजार समितीत गुळाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. त्याचे विलासकाका साक्षीदार होते. 

ते आमदार असताना त्यांनी सहकार, विधी व न्याय, मदत, पुनर्वसन मंत्रीपदाचाही कार्यकाल पार पाडला होता. त्यांच्याकडे अनेक मंत्री, खासदार, आमदार दौऱ्यावर येत होते. त्यांच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे विलासकाकांनी बुके देण्याचे टाळुन गुळाची ढेप, शाल, श्रीफळ देवुन त्यांच्या सत्कार करण्याची पध्दत रुढ केली होती. त्याची राज्यातील मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार चर्चा करत असत.

हा संदर्भ देत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मात्र, मला विलास काकांकडून गुळाची ढेप कधीच मिळाली नाही, असे सांगुन काकांच्या गुळाच्या ढेपेची आज आठवण करून दिली. त्यांच्या या ढेपेची विधान भवनात, मंत्रालायतही चर्चा व्हायची, असे नमुद केले.

Related Stories

No stories found.