मोठी बातमी : भावना गवळींच्या पाच संस्थांवर ईडीचे छापे

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप खासदार भावना गवळी यांनी फेटाळले होते.
 Bhavana Gawli .jpg
Bhavana Gawli .jpg

वाशिम : शिवसेनेच्या वाशिम मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने छापे टाकले आहेत. त्याच्या पाच शिक्षण संस्थांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर वाशिम जिल्ह्यात ईडीचे पथ दाखल झाले आहे. (ED's raids on five institutions of emotion) 

दरम्यान, गवळी यांच्या संस्थेच्या पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. हा 55 कोटीचा कारखाना असताना अत्यंत कमी किमतीत घेतला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून पुढील दोन आठवड्यात कारवाई सुरू होणार असल्याचे सोमय्या  यांनी सांगितले होते.  

सोमय्या यांनी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला होता. गवळी यांच्या ऑफिसमधून चोरी गेलेले सात कोटी रुपये आले कुठून असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदारांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असेही सोमय्या यांनी म्हटले होते. गवळी यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी ईडी, सीबीआय, राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खासदार यांच्यावर दोन आठवड्यात कारवाई सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई झाली असल्याने विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. 

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप खासदार भावना गवळी यांनी फेटाळले होते. गवळी म्हणाल्या, भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी हे वाशिम चे भूमाफिया आहेत. यांनी 500 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे. त्या बरोबर ईडी, सीबीआय ची चोकशी लावणार असल्याचे गवळी यांनी सांगितले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com