दहीहंडी साजरी करणारच ; मनसे ठाम

मनसेतर्फे ठाणे शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
Sarkarnama (36).jpg
Sarkarnama (36).jpg

मुंबई: राज्य सरकारकडून सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. आयोजक आणि मंडळांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. परंतु मनसेतर्फे ठाणे शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.दहीहंडी उत्सवावरुन मनसे आणि ठाकरे सरकार यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

''दहीहंडी साजरी करणारच,''या भूमिकेवर मनसे ठाम आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर व मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. अमेय खोपकर यांनी टि्वट करीत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.  "हिंदू सण साजरे होणारच. यंदाची दहीहंडी दणक्यात साजरी करणार. चलो ठाणे" असं टि्वट त्यांनी केलं आहे.  

मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का ?
ठाण्यात नौपाडा परिसरातील (thane dahihandi) भगवती शाळेच्या मैदानात दहीहंडी उत्सवावरुन पोलिस आणि मनसे आमने-सामने आले होते. मनसैनिकांकडून दहीहंडीसाठी स्टेज उभारण्याचे काम सुरु असताना पोलिस तेथे आले.  ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनसेचे नेते बाळ नांदगावकर यांनी ठाणे शहरातील भगवती मैदान येथे काल माध्यमांशी संवाद साधत दहीहंडी साजरा करण्यावर आपला पक्ष ठाम असल्याचे स्पष्ट केले. 

राज्य शासनाने निर्बंधांऐवजी नियमावली जाहीर करून दहीहंडी उत्सवाला परवानगी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  १८ वर्षांवरील आणि दोन लशींच्या मात्रा पूर्ण झालेल्या गोविंदांच्या पथकाद्वारे दहीहंडी साजरी करण्यास परवानगी देणे शक्य होते. परंतु सरकारकडून नकारात्मक भूमिका घेत दहीहंडी उत्सवाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नांदगावकर म्हणाले.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : विठ्ठल मंदिरासह राज्यभरातील देवस्थाने सुरू करावीत या मागणीसाठी आज भाजपाने आंदोलन सुरू केले आहे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे नेतृत्वाखाली पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर हे आंदोलन सुरू आहे.  अशा वेळी भाजप कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com