दिल्लीतून फॅक्स आला अन् दौरा ठरवत मातोश्रीचा दरवाजा उघडला!

मुख्यमंत्री ठाकरे यांनीही चिपळूण, महाड आदी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. याचदरम्यान राणेंसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांचाही दौरा झाला.
Minister Narayan Rane criticize CM Uddhav Thackeray over flood
Minister Narayan Rane criticize CM Uddhav Thackeray over flood

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. दोघांचाही दौरा एकाच दिवशी ठरला. पुर आल्यानंतर मुख्यमंत्री चौथ्यादिवशी आल्याचे पाहून राणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते चौथ्या दिवशी येण्याचं कारण सांगताना राणे यांनी आपण येणार असल्याचे समजल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरल्याचे सांगितले. (Minister Narayan Rane criticize CM Uddhav Thackeray over flood)

मुख्यमंत्री ठाकरे यांनीही चिपळूण, महाड आदी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. याचदरम्यान राणेंसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांचाही दौरा झाला. या दौऱ्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद झाला. ते म्हणाले, मुख्यमंत्री अजिबात संवेदशील नाहीत. पुरानंतर ते चौथ्यादिवशी का आले, ते सांगतो. काल मी साडे सहा वाजता फॅक्स केला. मी चिपळूण व रायगड येथे जाणार असल्याचे समल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम बनवला. मातोश्रीचा दरवाजा उघडला. 

मातोश्रीचा बंद होता. रुग्णालयात अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. दुर्घटना झाल्यानंतर लगेच पाहायला यायला हवे होते. सर्व उपाययोजना करायला हव्या होत्या. कपडे, जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. पाठांतर करून वाक्य यायची आणि लोकांमध्ये बोलायचे. राज्यात मुख्यमंत्री, प्रशासन नाही. भयावह स्थिती आहे, अशी टीका राणे यांनी केली. 

मुख्यमंत्री कोरोना घेऊन आले

कोरोना, पुर, वादळं हा राज्याच्या मुख्यमंत्र्याचा पायगुण असल्याची टीकाही राणेंनी केली. ते आल्यापासून वादळं, पाऊस, सगळं सुरूच आहे. कोरोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री कोरोना घेऊन आले. पाय बघायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का?, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. 

तोडीच्या लोकांशी राजकारण करतो

राज्याला मदत देता येत नाही का? केंद्राकडं मागितल्यानंतर केंद्र मदत देतचं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्राचं कौतुक केलं. आज ते विनम्र झाले. आम्ही याचं राजकारण करत नाही. ज्यांना राजकारण करता येत नाही, त्यांच्याशी करत नाही. आमच्या तोडीच्या लोकांशी आम्ही राजकारण करतो, असे टोला राणे यांनी लगावला. 

2005 पेक्षा भयावह स्थिती

बाजापेठेत मी फेरी मारली. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानात काही राहिले नाही. बाजारपेठेत भयावह परिस्थिती आहे. लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. 2005 साली झालेल्या स्थितीपेक्षा भयावह स्थिती यावेळी आहे. विविध य़ोजनांतून शक्य तेवढी मदत केली जाईल. ही आमची माणसं आहेत, त्यांच्या डोळ्यात भविष्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ, असं राणे म्हणाले. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना विचारत होती, पण काही सांगितलं नाही. कोणताही इशारा दिला नाही. लोकांच्या अश्रूंना प्रशासन जबाबदार आहे, असे राणे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com