'सरकार चालवायला द्या, वेटिंगवर बसलोय' असं म्हणत राणे फडणवीसांकडे बघून हसले! - Let the government run us we are waiting says Narayan Rane-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

'सरकार चालवायला द्या, वेटिंगवर बसलोय' असं म्हणत राणे फडणवीसांकडे बघून हसले!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 जुलै 2021

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनावर जोरदार प्रहार केला.

चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadanvis) त्यांच्यासोबत होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनावर जोरदार प्रहार केला. केंद्र सरकारकडून मदतीबाबत बोलताना त्यांनी थेट केंद्र मदत करेलच पण राज्य सरकार कशाला आहे मग? असा सवाल केला. (Let the government run us we are waiting says Narayan Rane)

पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राणे यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण राज्य सरकारनंही तातडीने मदत जाहीर करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. ठाकरे सरकारला उद्देशून ते म्हणाले, सारखं केंद्र केंद्र काय करता, राज्य सरकार कशाला आहे मग? केंद्राकडं द्या ना राज्य चालवायला. इथं आम्ही वेटिंगवर बसलोय, असं राणे म्हणाले आणि शेजारी बसलेल्या फडणवीसांकडे बघून हसले. त्यामुळं पत्रकार परिषदेतच हशा पिकला. 

हेही वाचा : येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार? भाजप अध्यक्ष म्हणाले...

तोडीच्या लोकांशी राजकारण करतो

राज्याला मदत देता येत नाही का? केंद्राकडं मागितल्यानंतर केंद्र मदत देतचं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्राचं कौतुक केलं. आज ते विनम्र झाले. आम्ही याचं राजकारण करत नाही. ज्यांना राजकारण करता येत नाही, त्यांच्याशी करत नाही. आमच्या तोडीच्या लोकांशी आम्ही राजकारण करतो, असे टोला राणे यांनी लगावला. 

2005 पेक्षा भयावह स्थिती

बाजापेठेत मी फेरी मारली. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानात काही राहिले नाही. बाजारपेठेत भयावह परिस्थिती आहे. लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. 2005 साली झालेल्या स्थितीपेक्षा भयावह स्थिती यावेळी आहे. विविध य़ोजनांतून शक्य तेवढी मदत केली जाईल. ही आमची माणसं आहेत, त्यांच्या डोळ्यात भविष्यात पाणी येणार नाही, याची काळजी घेऊ, असं राणे म्हणाले. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना विचारत होती, पण काही सांगितलं नाही. कोणताही इशारा दिला नाही, असे राणे यांनी सांगितले.

हेही वाचा : गोव्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत नड्डांची मोठी घोषणा; या नावावर शिक्कामोर्तब

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियम, प्रोटोकॉल माहिती नाही. एकही अधिकारी मला भेटला नाही. अतिरिक्त जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालयात बसले. विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री असताना आले नाहीत. त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुख्य सचिवांपासून संबंधित विभागाकडे तक्रार करून कारवाई करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. असे अधिकारी चिपळूणमध्ये ठेवू नका. ठेवले तर मी त्यांना खूर्चीवर बसू देणार नाही. मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले, ते पाहूणे आहेत का? पुढीलवेळी मी न सांगता येईन, मग बघू, असे राणे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख